esakal | सुजय विखे पाटलांनी का मानले पंकजा मुंडेंचे आभार

बोलून बातमी शोधा

Sujay Vikhe Patil thanked Pankaja Munde

खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी तसेच महाराष्ट्रातील ऊस तोड कामगार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध भागात अडकलेले आहेत. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन झाला आहे.

सुजय विखे पाटलांनी का मानले पंकजा मुंडेंचे आभार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः राज्यात ऊसतोड कामगारांची संख्या मोठी आहे. लॉकडाउनमुळे ते अडकून पडले आहेत. त्यांची उपासमार होत होती. मात्र, उसतोड कामगारांच्या प्रश्नामुळे राजकारण तापले होते. या प्रश्नात भाजप नेते आमदार सुरेश धस यांनी उडी घेतली होती. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनीही या प्रश्नात लक्ष घातले होते. परंतु भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आक्रमकपणे हा मुद्दा मांडला. सरकारला ऊसतोड कामगारांच्या प्रश्नात लक्ष घालण्यास भाग पाडले.

ऊसतोड कामगारांना स्वगृही परत येण्यासाठी यशस्वी लढा दिल्याबद्दल माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे आभार खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी मानले आहेत. 

हेही वाचा - एका बाटलीने केला घात..

खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी तसेच महाराष्ट्रातील ऊस तोड कामगार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध भागात अडकलेले आहेत. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन झाला आहे.

अशावेळी ऊसतोड कामगारांना ऐन हंगामात अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण झाली होती. शासन निर्णय प्रलंबित होता व अशा वेळेला ऊसतोड कामगारांच्या वेदना सरकारच्या कानावर घालत, सरकारला निर्णय घ्यायला पंकजा मुंडे यांनी भाग पाडले. या ऊसतोड कामगारांना जो लढा दिला आणि त्यात त्या यशस्वी झाल्या त्याबद्दल त्यांचे आभार खासदार डॉक्‍टर सुजय विखे पाटील यांनी आज एका प्रसिद्धीपत्रकातच्या मार्फत व्यक्त केले.