पाकाळणीच्या पहिल्या रविवारी दीड लाख भाविक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

जोतिबा डोंगर - जोतिबाच्या नावानं चांगभलं, यमाई, चोपडाई, नंदी, महादेव, बद्रिकेदार, काळभैरवाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात श्री क्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथे पाकाळणीचा पहिला रविवार मोठ्या भक्‍तिमय वातावरणात झाला. आज महाराष्ट्रासह, कर्नाटक राज्यातील सुमारे दीड लाख भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. आज डोंगराला मिनी चैत्र यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. लाखो भाविकांनी आज पालखी तसेच सासनकाठी व शिखरांवर गुलाल-खोबऱ्याची उधळण केली. चांगभलंच्या जयघोषाने डोंगर दणाणून गेला. 

आज चैत्र यात्रेला न आलेल्या सासनकाठ्या सवाद्य मिरवणुकीने डोंगरावर दाखल झाल्या. इचलकरंजी, सांगली, कऱ्हाड, सातारा, कर्नाटक या भागातील सासनकाठ्यांची दुपारी धुपारती वेळी मिरवणूक काढली. उन्हाच्या तीव्र झळा अंगावर झेलत भाविकांनी सासनकाठी नाचविण्याचा आनंद घेतला. सनई, पिपाणी, हलगी, ढोल, ताशे यांच्या तालावर या काठ्या नाचविल्या. 

आज पाकाळणीचा पहिला रविवार असल्याने शनिवारपासूनच भाविक डोंगरावर येत होते. पहाटेपासून मंदिरात दर्शनासाठी रांग लागल्या. सकाळी श्रींची सालंकृत महापूजा बांधण्यात आली. रात्री साडेआठ वाजता उंट, घोड्यासह भव्य पालखी सोहळा झाला. यावेळी लाखो हात पालखीवर गुलाल -ोबरे उधळण्यासाठी सज्ज झाले. गुलाल-खोबऱ्यासह नाणी यांची भव्य उधळण झाली. या वेळी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अधीक्षक लक्ष्मण डबाणे, सिंदिया ट्रस्टचे अधीक्षक आर. टी. कदम, सर्व देवसेवक, ग्रामस्थ, पुजारी उपस्थित होते. आज दर्शनासाठी ठाकरे, मिटके गल्लीपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या. कोडोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली कडक बंदोबस्त होता.तसेच पन्हाळा, शाहूवाडी, कोल्हापूर शहर, करवीर या पोलिस ठाण्यांचे कर्मचारी बंदोबस्तासाठी होते. 25 एप्रिलला भंडारा होऊन चैत्र यात्रेची सांगता होणार आहे. 

Web Title: Sunday half a million pilgrims