डाॅ. अच्युत माने लिखीत जीवनरंगचे रविवारी प्रकाशन

मंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार : निपाणीत संयोजकांची बैठक
 Meeting Nipani
Meeting Nipani sakal

निपाणी : ज्येष्ठ विचारवंत व परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते प्रा. डाॅ. अच्युत माने यांनी आपले जीवन आणि चळवळीतील अनुभवावर जीवनरंग हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (ता. १७) मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात सकाळी १०.३० वाजता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, माजी राज्यपाल पद्मश्री डाॅ. डी. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. त्यासाठी आज (ता. ९) सायंकाळी शासकीय विश्रामगृहात संयोजन समितीची बैठक झाली.

प्रमोद कांबळे यांनी स्वागत केले. त्यानंतर समितीचे अध्यक्ष अशोककुमार असोदे म्हणाले, डाॅ. अच्युत माने यांचे मागील ४० वर्षापासून कर्नाटक, महाराष्ट्रातील सामाजिक, परिवर्तनवादी चळवळीत योगदान आहे. पुस्तक प्रकाशनासाठी केंद्रीय मंत्री आठवले, माजी राज्यपाल डाॅ. पाटील यांच्यासह धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले, खासदार संजय मंडलिक, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी, हुतात्मा उद्योग समूहाचे वैभव नायकवडी, युवा नेते उत्तम पाटील, नगराध्यक्ष जयवंत भाटले, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शहाजी कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून तर साहित्यिक डाॅ. राजन गवस प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुस्तक प्रकाशनानंतर दुपारी २ वाजता निमंत्रित कवींचे कवि संमेलन होईल.

प्रा. शरद कांबळे म्हणाले, डाॅ. अच्युत माने यांनी दलित, देवदासी, तंबाखू, बिडी कामगार यांच्यासह शोषीत, वंचितांसाठी अविरत काम केले आहे. त्यांनी चळवळीत आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करताना आलेले अनुभव आणि सामाजिक जबाबदारी याबद्दलचे वर्णन पुस्तकात केले आहे. नव्या पिढीसाठी पुस्तक उपयुक्त व प्रेरणादायी ठरणार आहे.

सुधाकर माने, प्रा. सुरेश कांबळे, अस्लम शिकलगार, महाराष्ट्र एकीकरण समितीचे निपाणी भाग अध्यक्ष जयराम मिरजकर यांनीही माहिती दिली. यावेळी संयोजन समितीचे सर्व सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते. अजय माने यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com