
जत : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष सुनील पवार यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवून दिला आहे. ते गेल्या दीड-दोन वर्षांपासून जत तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत होते. त्यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने जतच्या राजकारणात जोरदार खळबळ उडाली आहे.