भाजपमधील गुंडांचे मुख्यमंत्र्यांनाच आव्हान : तटकरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

तासगावमध्ये काल भाजप व राष्ट्रवादीतील राड्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा साधला आहे. तासगावात भाजपाची गुंडागर्दी सुरू असून मुख्यमंत्र्याच्या गृहखात्यावरच हल्ला होत असून भाजपाकडून पोलिसांनाही मारहाण होत असून कायदा व सुव्यवस्था संपली आहे.

सांगली : तासगावातील भाजप गुंड कार्यकर्त्यांनी पोलिसांना मारहाण करून थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे, मुख्यमंत्रांनी याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे.

तासगावमध्ये काल भाजप व राष्ट्रवादीतील राड्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा साधला आहे. तासगावात भाजपाची गुंडागर्दी सुरू असून मुख्यमंत्र्याच्या गृहखात्यावरच हल्ला होत असून भाजपाकडून पोलिसांनाही मारहाण होत असून कायदा व सुव्यवस्था संपली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना तासगाव प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी करावी आणि पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणीही सुनील तटकरे यांनी सांगलीत बोलताना केली.  

दरम्यान आज राष्ट्रवादीचे दिग्गज नेते सांगलीत आहेत. राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा सांगली जिल्ह्यात आहे.

Web Title: Sunil Tatkare criticize Devendra Fadnavis on tasgoan riot