भिडेंच्या समर्थनार्थ मोर्चाला विविध संघटनांचा पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

शिवप्रतिष्ठानच्या वतीने 28 मार्चला काढण्यात येणाऱ्या मोर्चाची जोरात तयारी सुरु आहे. शहरासह जिल्ह्यात मोर्चाची डिजिटल पोस्टर लावण्यात आली आहेत. तसेच विविध संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. पुष्पराज चौकातील मोर्चा कार्यालयात संघटनांच्या नेत्यांनी भेट देऊन पाठिंब्याची पत्रे सादर केली. 

सांगली : शिवप्रतिष्ठानच्या वतीने 28 मार्चला काढण्यात येणाऱ्या मोर्चाची जोरात तयारी सुरु आहे. शहरासह जिल्ह्यात मोर्चाची डिजिटल पोस्टर लावण्यात आली आहेत. तसेच विविध संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. पुष्पराज चौकातील मोर्चा कार्यालयात संघटनांच्या नेत्यांनी भेट देऊन पाठिंब्याची पत्रे सादर केली. 

कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्याविरोधात नोंदवलेला गुन्हा मागे घ्यावा आणि त्यांना सन्मानपूर्वक मुक्त करावे, या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन केले आहे. त्याची जोरदार तयारी सुरु आहे. 
शिवप्रतिष्ठानच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मोर्चाला भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोपीचंद पडळकर, आर्य क्षत्रिय समाज, वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, कैकाडी समाज युवक संघटना, लिंगायत समाज संघटना, जनविकास प्रतिष्ठान, सांगली आणि वीरशैव लिंगायत समाज सुधार समिती सांगली यांनीही पाठिंबा जाहीर केला. 

पडळकर यांनी शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र सादर केले. सांगलीत येत्या बुधवारी होणाऱ्या या मोर्चाची शहरातील विविध चौकात डिजिटल पोस्टर्स लावण्यात आली आहेत. संभाजीराव भिडे सन्मान महामोर्चा असे मोर्चाला नाव दिले आहे. तसेच सर्व तालुक्‍यात आणि मोठ्या गावांमध्येही पोस्टर्स लावण्यात आली आहेत. मोचाच्या निमित्ताने शिवप्रतिष्ठानच्या वतीने गावागावात बैठकाही सुरु आहेत.

Web Title: To supports Bhide Guruji Various Unions Come