कऱ्हाडच्या सुपुत्रासमोर नक्षलवाद्यांची शरणागती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

पोलिस महानिरीक्षक होमकरांसमोर मोठे बक्षीस ठेवलेले यादव द्वयी हजर 

कऱ्हाड - झारखंड राज्यात नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ ठरलेले रांची (झारखंड) येथील विशेष पोलिस महानिरीक्षक व कऱ्हाडचे सुपुत्र अमोल होमकर यांच्यासमोर २० लाखांचे बक्षीस ठेवलेल्या नक्षलवादी नकुल यादव व त्यांचा सहकारी मदन यादव यांनी शरणागती पत्करली. श्री. होमकर यांचे हे यश कऱ्हाडच्या लौकिकात भर घालणारे असल्याचे कुटुंबीय, नातेवाइकांसह कऱ्हाडवासियांचे म्हणणे आहे.  

लोकसेवा आयोगाद्वारे श्री. होमकर हे भारतीय पोलिस सेवेत झारखंडमध्ये कार्यरत आहेत. पोलिस अधीक्षक असणाऱ्या श्री. होमकर यांना काही दिवसांपूर्वीच विशेष पोलिस महानिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे. रांची येथे सध्या ते कार्यरत आहेत. श्री. होमकर यांनी नक्षली कारवायांना आळा घालण्यात यश मिळवले असून, झारखंडमध्ये त्यांची नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ म्हणून ओळख आहे. रांचीसह लोहरदगा, गुमला, लाहेतर, पलामू आदी भागांत नक्षली कारवाया करणाऱ्या व सुमारे १५० गुन्हे दाखल असणारा नक्षलवादी नकुल यादव याच्यावर सरकारने १५ लाखांचे बक्षीस ठेवले होते. त्याशिवाय नक्षलवादी मदन यादव याच्यावर पाच लाखांचे बक्षीस ठेवले होते. मात्र, नकुल व मदन यादव यांनी श्री. होमकर यांच्यासमोर शरणागती पत्करली. या वेळी मोठ्या प्रमाणात शास्त्रसाठाही झारखंड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. श्री. होमकर यांच्यासह झारखंडचे सहायक पोलिस महासंचालक आर. के. मलीक उपस्थित होते. त्यामध्ये एके ४७, जिवंत काडतुसांसह विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा समावेश आहे. दरम्यान, श्री. होमकर यांच्या या यशामुळे त्यांचे कुटुंबीय, नातेवाइकांसह मित्रमंडळींनी आनंद व्यक्त केला. श्री. होमकर यांच्याकडून झारखंड येथे होत असलेली कामगिरी कऱ्हाडचा लौकिक वाढवणारी ठरत आहे.

Web Title: Surrender of Naxalites in front of Karhad's son