
तासगाव कारखाना स्थलांतरित कुटुंबांचे सर्वेक्षण
येळावी (सांगली) : येळावी केंद्रातील शिक्षकाकडून तासगाव तुरची कारखाना येथील स्थलांतरित ऊसतोड मजुरांच्या मुलांचे सर्वेक्षण कामकाज पूर्ण करण्यात आले. या सर्वेक्षणात १७५ कुटुंबांतून ५२ मुले शिक्षण प्रवाहात आणण्यात यश मिळाले.
तासगाव कारखाना तुरची साईट येथील कारखाना परिसरात राहणाऱ्या गाडीतळ स्थलांतरित ऊसतोड कामगारांची मुलांचे सर्वेक्षण काम करण्यात आले. यामध्ये भारती प्रशाला (माध्यमिक) येळावी फाटा येथे गाडीतळातील ६ ते १४ वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण कामकाज कसे करावे याबाबत प्रथम मार्गदर्शन करण्यात आले. लहान शाळेतील एक व मोठ्या शाळेतील दोन याप्रमाणे २८ बालरक्षक शिक्षक उपस्थित होते. प्रत्येकी दोन- दोन शिक्षकांचे ग्रुप पाडून सर्वेक्षण कुटुंबाचे नियोजन केले.
सर्वेक्षण कामकाज व्यवस्थित पूर्ण होण्यासाठी भारती प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.तांबिले सर, येळावी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.बापुसो हजारे, मुख्याध्यापक श्री. मोरे सर भारती प्राथमिक विद्यामंदीर तुरची फाटा. यावेळी तासगाव तालुका बालरक्षक प्रमुख नामदेव सुतार, जि.प.शाळा नागांव, व केंद्र बालरक्षक प्रमुख रजनीकांत वेळापुरे जि. प शाळा नेहरुनगर, तसेच येळावी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व केंद्रातील प्रत्येक शाळेतून बालरक्षक शिक्षक उपस्थित होते.
हेही वाचा- इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांना जेलची वारी -
या वेळी १७५ कुटुंबाचे सर्वेक्षण कामकाज पूर्ण केले. त्यामध्ये ५२ मुले दाखल करण्यात आली. पंचायत समिती तासगावचे विषयतज्ज्ञ भारत बंडगर यांच्या नियोजनानुसार कामकाज पूर्ण झाले. तासगाव तुरची कारखानाचे संचालक श्री. आर.डी(आप्पा) पाटील, शेती अधिकारी श्री. मिरजकरसो यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले.
संपादन-अर्चना बनगे