लोक कल्याणकारी उपक्रमात 'सुर्या' अग्रेसर राहील : आयुक्त संगीता धायगुडे

रुपेश कदम
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

मलवडी - सुर्या सामाजिक संस्था, आंधळी ही संस्था लोक कल्याणकारी उपक्रमात नेहमीच अग्रेसर राहील असा विश्वास मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे यांनी व्यक्त केला.

आंधळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात सूर्या सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी आयुक्त संगीता धायगुडे यांचे बोलत होत्या. यावेळी सरपंच मीनाक्षी काळे, गोपाळ गोरे, दादासाहेब काळे, माणदेश फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष प्रविण काळे, परशुराम कापसे, ग्रामस्थ व सुर्या संस्थेचे सदस्य उपस्थितीत होते.

आयुक्त संगीता धायगुडे म्हणाल्या की, सुर्या संस्थेने जलसंधारणासह वृक्षारोपण चळवळीत पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल. घटकांसाठी विविध प्रकारच्या मदत योजना सुरु करण्यात आल्या आहेत. गरजू रुग्णांना महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी मदत करण्यात येणार आहे. तसेच प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी प्रयत्नशील असणार्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकरता पुणे, बारामती येथे प्रशिक्षणासाठी सहकार्य करण्यात येणार आहे. सामाजिक कार्यासाठी झटणार्या सुर्या संस्थेस व त्यांच्या सदस्यांना मी सर्वतोपरी मदत करणार आहे. यावेळी आंधळीत झालेल्या जलसंधारणाच्या कामाचे कौतुक करुन वृक्षारोपणाच्या चळवळीला बळ देण्याचे आवाहन त्यांनी केले.

संस्थेचे अध्यक्ष घनशाम काळे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी किरण जगताप, सागर काळे, गणेश गोरे आदी सदस्य उपस्थित होते.

Web Title: 'Surya' will be the leading cause of public welfare: Commissioner Sangita Dhyagude