सुशीला दाते यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

सोलापूर - श्री गणेशाच्या उपासक सुशीला धुंडिराज दाते (वय 90) यांचे बुधवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. सुशीला दाते यांना कीर्तन व भारुडाची आवड होती. त्या स्वतः देखील कीर्तन व भारूड करीत असत. त्या राष्ट्र सेविका समितीच्या सक्रिय सदस्या होत्या. "मिसा' कायद्याखाली दाते परिवारातील सर्व पुरुष मंडळी अटकेत असताना घराचा व्याप सांभाळत त्यांनी देशकार्यही केले. सोलापुरातील रोटरी क्‍लबच्या वतीने त्यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित केले होते. पंचांगकर्ते मोहन दाते, सोलापूर जनता बॅंकेचे माजी अध्यक्ष सदाशिव आणि संस्कृतचे अभ्यासक गोविंदराव दाते यांच्या त्या मातुःश्री होत. 

Web Title: Sushila date dead