अमर साबळे म्हणजे उतावीळ नवरा गुडघ्याला बाशिंग : सुशीलकुमार शिंदे

Sushilkumar Shinde Amar Sabale
Sushilkumar Shinde Amar Sabale

सोलापूर : भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्या सोलापुरातील हालचाली पाहता, त्यांना उतावीळ नवरा गुडघ्याला बाशिंग असेच म्हणावे लागेल, असा टोला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार अॅड. शरद बनसोडे हेच असतील असा दावाही त्यांनी केला.

शिंदे म्हणाले, भाजपचे हे खासदार सोलापुरात सर्वत्र फिरत आहेत. अनेक कार्यक्रमातही सहभागी होत आहेत. त्यांचा प्रचारकी थाट आणि विविध ठिकाणी खासदार निधीची घोषणा करण्याचे प्रकार पाहता ते सोलापुरातून इच्छुक आहेत असे वाटते. त्यांचा वावर पाहता त्यांना भाजपचे तिकीट मिळाले आहे असेच आहे. मात्र त्यांनी आधी अधिकृत उमेदवारी आणावी आणि त्यानंतर प्रचार करावा. त्यांचे हे वागणे म्हणजे उतावीळ नवरा गुडघ्याला बाशिंग असेच आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून अॅड. बनसोडे हेच उमेदवार असतील, तशी माहिती मला मिळाली आहे. हा विषय भाजपचा असल्याने त्यांनी उमेदवारी कोणाला द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. मी मात्र कांग्रेसचे श्रेष्ठी जो आदेश देतील त्यानुसार काम करणार आहे, असेही शिंदे म्हणाले.

गाठीभेटींवर दिला भर
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. गावोगावी बैठका, हुरडा पार्टीच्या निमित्ताने गाठी-भेटी सुरु केल्या आहेत. मतदानावर प्रभाव पडेल असा एकही घटक सुटणार नाही याची दक्षता ते घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com