देशात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम सुरु : सुशीलकुमार शिंदे

राजकुमार शहा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

मोहोळ : देशात सध्या जातीय तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. देशातील वातावरण गढूळ होत असून, या जातीय वादाला थांबविण्यासाठी शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा आणण्यासाठी सर्वानी एकत्रित येण्याची गरज असून, बाहेरच्या उमेदवारामुळे जिल्ह्याचे वाटोळे झाले, असा आरोप माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला.

ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष आणि नगराध्यक्ष रमेश बारसकर यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश चिटणीसपदी निवड झाल्याने त्यांच्या सत्कार समारंभावेळी शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजन पाटील होते. यावेळी ज्योती क्रांती परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, तालुका अध्यक्ष अशोक देशमुख, शहाजहान शेख प्रकाश चवरे, प्रमोद डोके, रवी देशमुख, सतीश बारसकर, शिलवंत क्षीरसागर, कल्पना खंदारे, यशोदा कांबळे उपस्थित होते.

शिंदे पुढे म्हणाले, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्हीही सर्वधर्मसमभावाचे पक्ष आहेत. बारसकर यांचे काम चांगले असून, त्यांनी ज्योती क्रांती परिषदेचे सुरू केलेले काम हे पुरोगामी विचाराला प्रेरणा देणारे असून यासाठी लागणारी सर्वोतोपरी मदत करण्याची माझी तयारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राजन पाटील म्हणाले, की मागील वेळेस झालेली चूक सुधारण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक शिंदे यांनीच लढवावी, असा आग्रह पाटील यांनी केला.

Web Title: Sushilkumar Shinde criticizes Current Situations