चित्रपट निर्माता आत्महत्येप्रकरणी एक संशयित ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

सोलापूर - राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त म्होरक्‍या चित्रपटाचे निर्माते कल्याण पडाल यांच्या आत्महत्येप्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा दाखल झालेले दोघे खासगी सावकार फरार असल्याचे पोलिस उपायुक्त अपर्णा गिते यांनी सांगितले. 

पडाल यांच्या आत्महत्येप्रकरणात खासगी सावकार श्रीनिवास संगा, संतोष बसुदे व त्यांच्या साथीदारांवर जेलरोड पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण पडाल यांच्या पत्नी रेणुका पडाल यांनी फिर्याद दिली आहे. 

कर्करोगामुळे पडाल यांची प्रकृती खूपच बिघडली होती. औषधोपचारासाठी पैशाची गरज असल्याने पडाल यांनी श्रीनिवास संगा (रा. विजयनगर, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर) यांच्याकडून जानेवारी 2017 मध्ये एक लाख रुपये व्याजाने घेतले होते. तर संतोष नारायण बसुदे (रा. इंदिरानगर, सोलापूर) यांच्याकडून सप्टेंबर 2016 मध्ये एक लाख रुपये व्याजाने घेतले होते. संगा यांनी चक्रवाढ व्याजाने आकारणी करून नऊ लाख रुपयांची मागणी केली. दमदाटी करून धनादेशावर सह्या घेतल्या. बसुदे यांनी चक्रवाढ व्याजाने आकारणी करून जानेवारी 2018 मध्ये 11 लाख रुपये गाळे खरेदीपोटी दिल्याचे लिहून घेऊन पडाल यांचा गाळा घेतला होता. पैशासाठी दोघेही धमकी देत होते. 

13 मे रोजी सकाळी 10 वाजता दोघांनी कल्याण यांना घरातून बाहेर नेले होते. कल्याण रात्री घरी परत आले तेव्हा तणावाखाली होते. आजारापणाच्या उपचारासाठी संगा आणि बसुदे यांच्याकडून उसने पैसे घेतले होते. पैशासाठी दोघेही त्रास देत असल्याचे कल्याण यांनी कुटुंबीयांना सांगितले होते, असे फिर्यादीत नमूद आहे. दोघा सावकारांचा शोध सुरु असून, एका संशयितास ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त अपर्णा गिते यांनी सांगितले. 

आता आपणास कोणी पैसे मागणार नाही.. 
कल्याण पडाल यांनी 17 मे रोजी पहाटे पाचच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. आदल्या रात्री म्हणजे 16 मे रोजी कल्याण पडाल, पत्नी रेणुका, बहिणीचा मुलगा सागर कुरापाटी हे घरात जेवण करत होते. आता आपणास कोणी पैसे मागणार नाही व घरी कोणी येणार नाही. सागर तू पण टेंशन घेऊ नको असे कल्याण म्हणाले होते. सावकार श्रीनिवास संगा, संतोष बसुदे यांच्या दबावामुळे कल्याण तणावाखाली दिसत होते. आपण त्रास देणाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार देऊ, असे पत्नी रेणुका यांनी या वेळी सांगितले होते.

Web Title: suspect in the custody for the filmmaker's suicide