संशयित आरोपी अटकेत : फेसबुक कॉमेंट खुन प्रकरण

हुकूम मुलाणी
रविवार, 20 मे 2018

मंगळवेढा : फेसबुक पोस्टवरून कॉमेंट टाकण्याच्या वादातुन मंगळवेढ्यातील मुरलीधर चौकात मयत सचिन कलुबर्मे या युवकाचा खून प्रकरणातील फरार संशयीत आरोपी दोन नगरसेवक व अन्य एका साथीदारांस गुजरातमधील बलसार येथे अटक करण्यात पोलिसांना यश आले. आरोपी नगरसेवकाच्या अटकेने पोलिस नि.श्वास सोडला.
     
भर चौकात हे खून प्रकरणात घडल्याने नागरिकात घबराटीचे वातावरण होते. या प्रकरणात आता पर्यंत अन्य आरोपीस अटक केली असून संशीयीत नगरसेवक प्रशांत यादव, पांडुरंग नाईकवाडी हे दोघे खुनाचा गुन्हा घडल्यापासून फरार होते. त्यांना अटक करावी म्हणून पोलिसावर दबाव होता. या आरोपीला अटक करावी म्हणून मयताचे वडीलांनी ज्ञानेश्वर कलुबर्मे यांनी पोलिस स्टेशन समोर उपोषण केले होते आरोपीच्या अटकेचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते. या आरोपीच्या अटकेसाठी पोलीसाची चार पथके तैनात केली होती. या दोन्ही नगरसेवक आणि त्यांच्या एका साथीदारांसमवेत अटक केली असून न्यायालयात उभे करणार असल्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी सांगितले. 

Web Title: Suspected accused detained: murder case for Facebook comment