आईवर हल्ला प्रकरणी अटकेत असलेल्या संशयिताचा न्यायालयातून पलायनाचा प्रयत्न 

आईवर हल्ला प्रकरणी अटकेत असलेल्या संशयिताचा न्यायालयातून पलायनाचा प्रयत्न 

कोल्हापूर - आईवर प्राणघातक हल्ला प्रकरणातील संशयिताने आज सकाळी न्यायालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून पलायन करण्याचा प्रयत्न केला. तो पोलिसांनी शिताफीने हाणून पाडला. पण यात तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी पोलिसांनी सीपीआरमध्ये दाखल केले. बाळासाहेब ऊर्फ शशिकांत गणपती पाटील (वय 42, रा. सडोली खासला, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. याबाबतची नोंद करण्याचे काम शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुरू होते. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सडोली खालसा येथे राहणारा संशयित बाळासाहेब ऊर्फ शशिकांत याला त्याची आई सुलाबाई यांनी 10 सप्टेंबरला सायंकाळी तू कामावर का जात नाहीस अशी विचारणा केला होती. या रागातून त्याने आईसह मुलगा श्रीरंग या दोघांवर खुरप्याने हल्ला केला. याप्रकरणी करवीर पोलिसात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. त्याच दिवशी त्याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. आज त्याची पोलिस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार होते. यासाठी पोलिस हवालदार किशोर चौगुले हे तीन होमगार्डच्या मदतीने सकाळी साडेदहाच्या सुमारास त्याला न्यायालयात घेऊन गेले. पहिल्या मजल्यावरून जात असताना त्याने पोलिसांच्या हाताला हिसडा मारून थेट सुमारे 10 ते 12 फुटावरून खाली उडी मारली. त्यात तो पाय घसरून लोखंडी ग्रीलच्यामध्ये पडला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची तांराबळ उडाली. त्यांनी खाली येऊन बाळासाहेब ऊर्फ शशिकांतला पकडले. मात्र या घटनेत त्याच्या हाताला व पाठीला दुखापत झाली. पोलिसांनी तातडीने त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.  

संशयित बाळासाहेब ऊर्फ शशिकांत पाटीलने न्यायालयाच्या पहिल्या मजल्यावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यात तो पाय घसरून पडल्याने जखमी झाला. त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 
- किशोर चौगुले,
पोलिस हवालदार, करवीर पोलिस ठाणे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com