अनुराधा खूनप्रकरणातील आरोपी विठ्ठल बिराजदार यांना तातडीने निलंबित करावे

अनुराधा खूनप्रकरणातील आरोपी विठ्ठल बिराजदार यांना तातडीने निलंबित करावे

मंगळवेढा - तालुक्यातील सलगर(बु) येथील डॉ.अनुराधा बिराजदार यांच्या खुन प्रकरणातील सशंयीत आरोपी विठ्ठल बिराजदार हे गावातील विद्यामंदीर हायस्कूल व ज्यु कॉलेजमध्ये लिपीक म्हमऊ कार्यरत आहेत. त्या प्रकरणात त्याना अद्यापही निलंबित केले नसल्याची तक्रार माजी प्राचार्य वसंत आसबे, सुशिल मेंडगुदली, महादेव पाटील यानी निवेदनाव्दारे शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की अर्जदार हे शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे विश्वस्त आहेत. संस्थेच्या निवडणूकीतील वादामुळे संस्थेचे संचालक मंडळाबाबतचे प्रकरण धर्मादाय आयुक्ताकडे न्यायप्रविष्ठ आहे. संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या माध्यमिक शाळेतील लिपीक विठ्ठल बिराजदार हे मुलीच्या खुन प्रकरणात सशंयीत आरोपी असून सध्या ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. न्याय प्रकियेत एखादा आरोपी 48 तासापेक्षा अधिक वेळ पोलिस कस्टडीत राहिल्यास त्याला निलंबित करावे लागते. तरीही 20 दिवसापेक्षा अधिक कालावधी जावूनही बिराजदार यांना अद्यापही निलंबित करण्यात आले नाही. किवा त्या बाबतचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविला नसल्याने या कारवाईस मुख्याध्यापक देखील ही माहिती दडवून ठेवल्यामुळे तितकेच जबाबदार आहेत. एवढ्या प्रमाणात माध्यमातून ओरड होवूनही मुख्याध्यापक अज्ञभिज्ञ कसे ? म्हणून लिपीक विठ्ठल बिराजदार यांना निलंबित करण्यात यावे व मुख्याध्यापकावर शिस्त भंगाची कारवाई करण्याची मागणी निवेदनात नमूद केली.

लिपीक बिराजदार याच्या अटकेबाबतचे पत्र पोलिसाकडून अद्यापही प्राप्त झाले नाही. तरीही माध्यमातील बातम्यावरून संस्थेतील सध्याच्या वादामुळे संचालक मंडळ न्याय प्रविष्ट असल्याने निलंबित करण्याच्या आदेशाबाबत मी आज दि.29 रोजी शिक्षण विभागाकडे मार्गदर्शन मागणार आहे. 
- रमेश चिनगे मुख्याध्यापक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com