सोलापूर प्राणीसंग्रहालय बंदच्या आदेशास स्थगिती 

सोलापूर प्राणीसंग्रहालय बंदच्या आदेशास स्थगिती 

सोलापूर : केंद्रीय चिडीयाघर प्राधिकरणाने सोलापूर प्राणीसंग्रहालय बंद करण्याचा आदेश दिला होता. त्यास केंद्रीय पर्यावरण सचिव एस.एन. मिश्रा यांनी आज (सोमवारी) काहीवेळापूर्वी स्थगिती दिली. दरम्यान, सुधारणा करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिल्याचे महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी ताजणे यांनी दिल्लीतून "सकाळ'ला दिली. 

निश्‍चित केलेल्या निकषानुसार कोणत्याही सुविधा, पिंजरे या ठिकाणी नसल्याचा ठपका प्राधिकरणाने ठेवला होता. या संदर्भात तत्कालीन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी, निकषानुसार प्राणीसंग्रहालयात सुधारणा करण्यात येत आहेत. काही महिन्यांपूर्वी या संदर्भात झालेल्या सुनावणीवेळी मी स्वतः गेलो होतो. त्यावेळीही त्यांना ही माहिती दिली होती. त्यांच्या सूचनेनुसार कामे सुरु असतानाही प्राणीसंग्रहालयाची मान्यता रद्द केली आहे. या बाबत केंद्र सरकारकडे अपील करण्यात येणार आहे, असे सांगितले होते. दरम्यान, बंदच्या आदेशाला स्थगिती द्यावी यासाठी युवक कांग्रेसने आंदोलनही केले होते, तसेच बसपचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी सर्वसाधारण सभेत मुद्दाही उपस्थित केला होता. 

दरम्यान, विद्यमान आयुक्त दीपक तावरे यांनी केलेल्या सूचनांसह सोमवारी सकाळी डॉ. ताजणे यांनी मिश्रा यांच्यासमोर केलेल्या कामांची माहिती दिली. तसेच त्रुटी दूर केल्याचा अहवालही त्याचवेळी पाठविल्याचे आवर्जून सांगितले. त्याची दखल घेत श्री. मिश्रा यांनी प्राधिकरणाच्या आदेशाला स्थगिती दिली तसेच सुधारणा करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतही दिली. 

प्राधिकरणाने सूचविलेल्या त्रुटी यापूर्वीच दूर केल्या आहेत. आता मिळालेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत, दिल्लीतील बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही केली जाईल. 
- डॉ. शुभांगी ताजणे, पशुवैद्यकीय अधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com