esakal | '..अन्यथा तुमच्या घरावरही दगडं पडायला वेळ लागणार नाही'; सदाभाऊ खोत यांना इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

'..अन्यथा तुमच्या घरावरही दगडं पडायला वेळ लागणार नाही'

गुंडागर्दी आम्ही खपवून घेणार नाही. चारही गुंडांना तात्काळ अटक करावी. अन्यथा सदाभाऊ खोत याच्या घरासमोर आंदोलन करु

'..अन्यथा तुमच्या घरावरही दगडं पडायला वेळ लागणार नाही'

sakal_logo
By
विष्णू मोहिते

सांगली : आमदार सदाभाऊ खोत याचे चिरंजीव सागर खोत यांच्यासह चार गुंडांनी सोमवारी रात्री स्वाभिमानीचे कार्यकर्ते रवीकिरण माने यांच्या घरात घुसून त्यांच्यासह त्यांच्या कुंटूबियांना बेदम मारहाण केली. ही गुंडागर्दी आम्ही खपवून घेणार नाही. चारही गुंडांना तात्काळ अटक करावी. अन्यथा सदाभाऊ खोत याच्या घरासमोर आंदोलन करु, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी आज दिला.

हेही वाचा: सदाभाऊ खोत यांच्या मुलाकडून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याला मारहाण

जिल्हाध्यक्ष खराडे म्हणाले की, गेली चार दिवस खासदार राजु शेट्टी यांनी काढलेल्या पुरग्रस्ताचा मोर्चामुळे सोशल मिडीयावर गेली आठ दिवस वाकयुध्द सुरू होते. सोशल मिडीयावर राजकीय टीका टिप्पणी सुरू होती. सदाभाऊ खोत यांनीच प्रथम टीकेला प्रारंभ केला. त्यामुळे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सुरू केले. ही टीका सदाभाऊ यांच्या कार्यकर्त्यांना झोंबली. यातुन तांबवेतील स्वाभिमानीचे कार्यकर्ते रवीकिरण माने यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. हे आमदार खोत याच्या मुलाला अशोभनीय आहे. त्यांनी पहिल्यादा कडकनाथ कोंबडी घोटाळ्यातील फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत. कडकनाथ घोटाळ्यात फसवणूक झालेल्या तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्याचे अश्रू पसुले तर बरे होईल.

हेही वाचा: कोकणात जाण्यासाठी 'गणपती विशेष'ची चाकरमान्यांना प्रतिक्षाच; प्रस्तावाला अद्याप मंजूरी नाही

कडकनाथ कोबडी घोटाळा प्रकरण कशा पध्दतीने आपण मनेज केले हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. आपण चळवळीतुन तयार झाला, असे सांगाता सदाभाऊ तुम्ही तर राज्यातील सर्वच नेत्यांवर टीका करत आला आहात. मग तुमच्यावर टीका झाली तर ती सहन करायची, पचवायची तयारी ठेवायला हवी, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगडे मारू नयेत. अन्यथा तुमच्या घरावरही दगडे पडायला वेळ लागणार नाही. ही गुंडगिरी आपल्याला अशोभनीय आहे. आपणास स्वाभिमानीचे कार्यकर्ते जशास तसे उत्तर देतील. पोलिसांनी त्यांचे काम चोख करावे. अन्यथा पोलिस ठाणी ही आमच्या तावडीतून सुटणार नाहीत. सदाभाऊंच्या घरवरही वेळ पडल्यास धडक मारू. आम्हाला कुणी कमजोर समजण्याची चूक करू नये.

loading image
go to top