'एफआरपी'साठी स्वाभिमानीचे कार्यकर्ते-पोलिसांत वादावादी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 जानेवारी 2019

सांगली : ऊसाच्या एकरकमी एफआरपीबाबत सहकारमंत्री सुभाष देशमुख कोणतीही भूमिका घेत नाहीत. त्यांच्या भूमिकेविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांना आज जिल्हा नियोजन समितीत घुसण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोलिस-स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांत जोरदार वादावादी झाली. कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी सरकार व सहकारमंत्री देशमुख यांच्या भूमिकेबाबत शंखध्वनी केला.

पालकमंत्र्यांना जाब विचारण्याचा रेटा धरणाऱ्या स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिसांत वादावादी झाली, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. अचानकपणे आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, संदीप राजोबा, सयाजी मोरे यांच्यासह कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची पालकमंत्री तथा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षेखाली सभा होती. साखर कारखाने सुरु होऊन दोन महिने होऊनही ऊसाची एफआरपी दिलेली नाही.

कारखान्यांकडून ऊस बिलाची दमडीही दिली नसल्याने त्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकारमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला होता. दुपारी दीडच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आले. ऊसाला एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे, या मागणीसाठी मंत्री देशमुख यांना भेटणार असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांना नियोजन समितीची बैठक सुरु आहे, त्यामुळे भेटता येणार नसल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर घोषणाबाजीला सुरवात केली.

पोलिसांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. मात्र, कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आंदोलन सुरु केले आहे. एकरकमी एफआरपीचा शेतकऱ्यांचा अधिकार असून, तो मिळविण्यासाठी सहकारमंत्र्यांना भेटण्याची पुन्हा विनंती करण्यात आली. परंतु पोलिसांनी परवानगी नाकारल्याने कार्यकत्यांशी वादावादी झाली. त्यानंतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

Web Title: Swabhimani Activists and Police Dispute for FRP Issue