बिर्याणी निकृष्ट दर्जाची असल्याचे कारण सांगत हॉटेलच्या व्यवस्थापकावर तलवार हल्ला | Sword Attack | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beating.

बिर्याणी निकृष्ट दर्जाची असल्याचे कारण सांगत हॉटेलच्या व्यवस्थापकावर तलवार हल्ला

बेळगाव - झोमॅटोवरून मागविण्यात आलेली बिर्याणी निकृष्ट दर्जाची असल्याचे कारण सांगत आरपीडी क्रॉस येथील डोन्ने बिर्याणी हॉटेलच्या व्यवस्थापकावर दोघांनी तलवार हल्ला केला. शनिवार (ता. १३) रात्री १२.३० च्या सुमारास ही घटना घडली असून नंदकुमार एच. डी. असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी टिळकवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

यल्लाप्पा गावडे (रा. अनगोळ) आणि नितीन चौगुले (रा.भाग्यनगर) या दोघांना पोलिसांनी तलवार हल्ला प्रकरणी अटक केली आहे. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे. वरील दोघा संशयितानी काल रात्री झोमॅटो वरून आरपीडी क्रॉस येथील दोन्ही डोन्ने बिर्याणी मधून बिर्याणी मागवली होती. त्यानुसार डिलिव्हरी बॉयने त्यांना बिर्याणी पोच केली.

हेही वाचा: Solapur : 55 मेल एक्सप्रेस गाड्यांचा स्पेशल दर्जा काढला!

मात्र, रात्री १२.३० च्या सुमारास बिर्याणी निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार फोनवरून करण्यात आली. डोन्ने बिर्यानीचे व्यवस्थापक नंदकुमार एचडी यांनी सदर फोन घेतला होता. तसेच यावेळी शिवीगाळही करण्यात आली. त्यामुळे व्यवस्थापक नंदकुमार यांनी बिर्याणीचे पैसे रिफंड करतो असे सांगितले तरी देखील वरील दोघेजण रात्री १२.३० सुमारास बिर्याणी सेंटरनजिक आले. व त्यानी व्यवस्थापक नंदकुमार यांच्याशी भांडण काढत त्यांच्या डोकित तलवारीने वार केला. या घटनेमुळे काहीवेळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी जखमी नंदकुमार यांनी टिळकवाडी पोलिसात फिर्याद दाखल केल्याने पोलिसांनी आज वरील दोघा संशयितांना अटक केली आहे. टीळकवाडीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार पुढील तपास करीत आहेत.

loading image
go to top