Solapur : 55 मेल एक्सप्रेस गाड्यांचा स्पेशल दर्जा काढला! सोमवारपासून अंमलबजावणी; तिकीटदर देखील पूर्वीप्रमाणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Train

Solapur : 55 मेल एक्सप्रेस गाड्यांचा स्पेशल दर्जा काढला!

sakal_logo
By
विजय थोरात

सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणाऱ्या तब्बल 55 मेल एक्सप्रेस गाड्यांचा स्पेशल दर्जा काढण्याचा रेल्वे प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सोमवार ता. 15 नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा: ड्रग्ज सापडण्याआधी गुजरातच्या 'त्या' बंदराचं नाव वेगळं - कोल्हे

कोरोना काळात सोलापूर विभागातील रेल्वे गाड्यांना स्पेशल दर्जा देण्यात आला होता. मात्र कोरोनाची परिस्थिती ओसरल्यानंतर स्पेशल दर्जा काढण्यात आला असून, तिकीट देखील पूर्वीप्रमाणे होणार असल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ज्या प्रवाशांनी आधीच आरक्षित तिकीट काढले आहे त्यांना तिकिटांचा कोणताही परतावा मिळणार नसल्याचे देखील रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

कोरोनाच्या काळात रेल्वे प्रशासनाने रेल्वे गाड्यांना शून्य क्रमांक देऊन स्पेशल दर्जा देण्यात आला होता. त्याचबरोबर कोरोनाच्या महामारीच्या काळात प्रवाशांना मिळणार्‍या 53 प्रकारच्या सवलती देखील रेल्वे प्रशासनाकडून बंद करण्यात आल्या होत्या. रेल्वे गाड्यांना स्पेशल दर्जा देण्यात आल्यामुळे तिकीट दरांमध्ये देखील मोठी वाढ करण्यात आली होती. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास महागडा झाला होता. मात्र तब्बल 20 महिन्यानंतर सोलापूर विभागातील धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचा स्पेशल दर्जा काढण्यात आला आहे.

हेही वाचा: स्मशानभूमीत आंदोलन करून राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा

या नियमित ट्रेनच्या अधिक तपशीलवार माहिती साठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा.तरी सर्व संबंधित रेल्वेे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी व आपल्या प्रवास सुनिश्चित करण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

"तब्बल 20 महिन्यानंतर रेल्वे प्रशासनाने रेल्वे गाड्यांचा स्पेशल दर्जा काढण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. लवकरच प्रवाशांना मिळणाऱ्या कोरोना पूर्वीच्या सर्व सवलती सुरू कराव्यात जेणेकरून प्रवाशांना याचा लाभ घेता येईल."

- संजय पाटील, अध्यक्ष, प्रवासी सेवा संघ , सोलापूर

हेही वाचा: एकाच चाकात 26 पंक्चर दाखवून तीन हजार रुपये उकळले

या गाड्यांचा काढण्यात आला स्पेशल दर्जा

 • गाडी क्र. 11013/11014 एलटीटी-कोईमतूर एक्सप्रेस,

 • गाडी क्र. 11017/ 11018 एलटीटी-करायकल एक्सप्रेस,

 • गाडी क्र. 11019/ 11020 मुंबई-भुनेश्वर एक्सप्रेस,

 • गाडी क्र. 11027/11028 दादर-पंढरपूर एक्सप्रेस,

 • गाडी क्र. 11033 / 11034 पुणे-दरभंगा एक्सप्रेस,

 • गाडी क्र. 11039/11040 कोल्हापूर-गोदिया एक्सप्रेस,

 • गाडी क्र. 11041/11042 दादर-साईनगर शिर्डी एक्सप्रेस,

 • गाडी क्र. 11045/ 11046 कोल्हापूर-धनबाद एक्सप्रेस,

 • गाडी क्र. 11037/11038 पुणे-गोरखपूर एक्सप्रेस,

 • गाडी क्र. 12131/12132 दादर-साईनगर शिर्डी एक्सप्रेस,

 • गाडी क्र. 11139/11140 मुंबई-गदग एक्सप्रेस,

 • गाडी क्र. 12157/12158 पुणे-सोलापूर एक्सप्रेस,

 • गाडी क्र. 22101/22102 एलटीटी-मदुराई एक्सप्रेस,

 • गाडी क्र. 11301/11302 मुंबई-बेंगलुरू एक्सप्रेस,

 • गाडी क्र. 11311/11312 सोलापूर-हसन एक्सप्रेस,

 • गाडी क्र. 11403/11404 नागपूर-कोल्हापूर एक्सप्रेस,

 • गाडी क्र. 11407/11408 पुणे-लखनौ एक्सप्रेस,

 • गाडी क्र. 11013 एलटीटी-कोईमतूर एक्सप्रेस,

 • गाडी क्र. 11409 दौंड-निजामाबाद डेमू,

 • गाडी क्र. 11013 निजामाबाद-पुणे डेमू,

 • गाडी क्र. 11421/11422 पुणे-सोलापूर डेमू,

 • गाडी क्र. 22159/2260 मुंबई-चेन्नई एक्सप्रेस,

 • गाडी क्र. 22179/22180 एलटीटी-चन्नैई एक्सप्रेस,

 • गाडी क्र. 22143/ 22144 मुंबई-बिदर एक्सप्रेस,

 • गाडी क्र. 12103/12104 पुणे-लखनौ एक्सप्रेस,

 • गाडी क्र. 12115/12116 मुंबई-सोलापूर एक्सप्रेस,

 • गाडी क्र. 22147/22148 दादर-साईनगर शिर्डी एक्सप्रेस,

 • गाडी क्र 12163/12164 एलटीटी-चेन्नई एक्सप्रेस,

 • गाडी क्र. 22107/22108 मुंबई-लातूर एक्सप्रेस.

loading image
go to top