खंडणीसाठी दाखविला तलवारी, कोयत्याचा धाक

संतोष चव्हाण
शनिवार, 19 मे 2018

उंब्रज (सातारा)  : भोसलेवाडी येथे तारळी नदीत माती मिश्रीत वाळु उपशाच्या ठिय्यांवर आठवड्याला ५० हजाराची खंडणी मागत दमदाटी करुन तलवारी, कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवल्याबद्दल आठ जणांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. त्याबाबत काल (शुक्रवारी) सायंकाळी गुन्हा नोंद झाला आहे. 

रात्री वाळु ठेक्यावरील दिवाण प्रदिप साळुंखे (वय ३५, सदर बाजार, सातारा) यास मारहाण करून वीस हजाराची रोकडही लंपास केली आहे. साळुंखे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आठ जणांवर दरोड्यासह खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पैलवान नयन ऊर्फ नयनेश निकम (इंदोली) सचिन बागल (येणपे), निहाल मोमीन (उंब्रज), विनोद शिंदे (अंतवडी), दिलीप शेवाळे (म्हासोली), योगेश जाधव (आटके) अशी त्यांची नावे आहेत. अन्य दोघे नावे समजू शकलेली नाहीत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोसलेवाडी येथे निशांत भोसले यांचा माती मिश्रीत वाळुचा परवाना आहे. फिर्यादी प्रदीप साळुंखे तेथे दिवणजीचे काम करतात. शिवाय ते ट्रान्सपोर्टही करतात. दुपारी बारा वाजता नयन ऊर्फ नयनेश निकम व त्याचे साथीदार चार दुचाकीवरुन वाळु उपशाच्या ठिकाणी गेले. त्याच्या हातात तलवारी, कोयते होते. नयनने साळुंखे यांना "तुला ठिय्यां चालवायचा असेल तर मला आठवड्याला पन्नास हजार द्यावे लागतील", अशी धमकी दिली. खंडणी देण्यास नकार दिल्याने नयनला मारहाण केली. यावेळी आवटीवरील कामगार नागेश राठोड, किरण जाधव, अरविंद भोसले मधे पडले. त्यावेळी नयन व त्याच्या साथीदारांनी तलवारी, कोयत्याने भीती दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी त्यांनी दहशत माजवत साळुंखेच्या खिशातील वीस हजार रुपये जबरदस्तीने काढुन घेवून तेथून पोबारा केली. सायंकाळी सातच्या सुमारास त्याबाबत साळुंखे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंद झाला आहे. 

Web Title: sword used for ransom crime

टॅग्स