नेवाशात तब्लिकी इज्तेमास प्रारंभ; पहिल्या दिवशी ७० हजार भाविकांची उपस्थिती

newasa
newasa

नेवासे : नेवासे - नेवासे फाटा मध्यवर्ती ठिकाणावरील काझी नगर परिसराच्या चारशे एकार मैदानावर काल (शुक्रवार) रोजी तब्लिक जमाततर्फे आयोजित जिल्हास्तरीय इज्तेमास शुक्रवारच्या सकाळच्या नमाज व बायानानंतर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. आज पहिल्या दिवशी जिल्ह्यातून सुमारे सत्तर हजार भाविकांची उपस्थिती होती. 

सत्याच्या मार्गावर चालावे, कोणालाही दुखवू नये. तसेच देशातील एकात्मता अखंडित राहो, आपसात भाईचारा निर्माण होवे, अहंकार, घमंड, श्रीमंत-गरीब यातील भेद दूर व्हावे, माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म या शिकवणीसाठी ताब्लिक जमाततर्फे दोन दिवसीय जिल्हास्तरीय इस्तेमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे नगर येथील जमाते अमीर अब्दुल सलीम साहेब प्रवचन प्रसंगी बोलत होते. 

दरम्यान शनिवारी विश्वाशांतीसाठी सामुहिक दुवामध्ये सामील व्हावे याकरिता दुवाच्या वेळी भाविक मोठ्या संख्येने दुवा कार्येक्रमात सामिल होतात देशासह विश्वामध्ये शांती भाईचारा नांदावी यासाठी दुवा होणार आहे. तसेच सामुदैल विवाहाचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली. खाद्य पदार्थाच्या स्टॉलवर भाविकांसह नेवासे शहरातील हिंदूधर्मिय नागरिकांनी हजेरी लावून स्वाद घेतला. पहिल्याच दिवशी लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. 

स्वच्छतेचे दर्शन
शुक्रवारी पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सुमारे सत्तर हजार भाविक इज्तेमा स्थळी उपस्थित होते. या ठिकाणी सुमारे 102 खाद्य पदार्थासह विविध स्टॉल आहे. मात्र या सह संपूर्ण परिसरात स्वच्छतेसाठी व विविध नियोजानासाठीचे स्वयंसेवकांसह उपस्थित भाविक स्वच्छतेबाबत जागरूक असल्याने या चारशे एकर मैदान स्वच्छता दिसत होती. . 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com