

“Sahyadri Celebrates Tadoba’s Chanda with Colorful Haldi Ceremony”
Sakal
शिराळा : ताडोबा जंगलातून आलेली ‘चंदा’ आता चांदोलीच्या जंगलात ‘तारा’ बनली आहे. सोनार्ली परिसरातील हिरव्यागार जंगलात तिला तात्पुरत्या काळासाठी मुक्त करण्यात आले आहे. तिच्या सुरक्षेसाठी व आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी वन्यजीव विभागाचे अधिकारी, कर्मचारी तैनात आहेत. नव्या परिसराशी ती पूर्ण जुळवून घेते का, यासाठीची ही प्रक्रिया आहे. तिचे व्यवहार नैसर्गिक पद्धतीने स्थिर झाल्यावर पुढच्या टप्प्यात नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे. या जंगलात एकूण आठ वाघ सोडले जाणार आहेत. त्यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची असणार आहे. कसे आहे, ‘ऑपरेशन तारा’ याचा ग्राऊंड रिपोर्ट.