ऑलिंपिकचे ध्येय गाठण्यासाठी पूर्वाला हवे मदतीचे बळ

ऑलिंपिकचे ध्येय गाठण्यासाठी पूर्वाला हवे मदतीचे बळ

तारळे (जि. सातारा) : वयाच्या सहाव्या वर्षांपासून ती तायक्वांदो खेळते आहे. सामान्य कुटुंबात जन्म झालेल्या व पाठबळ नसताना दहा वर्षांत तब्बल 12 सुवर्णपदके तिने मिळवली आहेत. तायक्वांदोत वेगळा ठसा उमटवणाऱ्या येथील पूर्वा दीक्षितने मिळवलेले यश जिल्ह्यासाठीही मानाचा तुरा ठरत आहे.

हेही वाचा - महाबळेश्‍वर : एलीफिस्टनच्या दरीतून ट्रेकर्सने शाेधले लाखाे रुपये

गावकडची "मेरी कोम' अशी ओळख निर्माण करणारी पूर्वा सध्या पुण्यात आहे. ऑलिम्पिकमध्ये नॉकआउट पंच मारायचा तिचा ध्यास आहे. मात्र, तिथवर पोचण्यासाठीच्या तयारीसाठी तिला आर्थिक चक्रव्यूह भेदावे लागणार आहे. त्यासाठी समाजानेही हातभार लावण्याची गरज आहे. 

येथील ऍड. दत्तात्रय दीक्षित हे व्यवसायानिमित्त कोथरूड पुणे येथे आहेत. त्यांची पूर्वा ही कन्या. तिचे शिक्षण पुण्यात पार पडले. वयाच्या सहाव्या 
वर्षापासून तायक्वांदो खेळाकडे ओढा लागला. तिने खेळात विशेष नैपुण्य मिळविले. विद्यापीठस्तरावर खेळात चमकली. 2010 पासून तिने राष्ट्रीय पातळीवर खेळण्यास सुरवात केली. पहिल्याच प्रयत्नात सुवर्ण कामगिरी साकारली.

जरुर वाचा -  कोसळलेलं आयुष्य पेलताना..!

पुढच्याच वर्षी झालेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले. तेव्हापासून तिने मागे वळून पाहिले नाही. 2010 ते 19 या नऊ वर्षांत विविध राष्ट्रीय व एशियन स्तरावरील स्पर्धांत तिने तब्बल 12 सुवर्णपदकांची कमाई केली आहे. याशिवाय जागतिक चॅम्पियनशिप कोरियामध्ये व आंतरराष्ट्रीय एशियन चॅम्पियनशिप फिलिपीन्समध्ये देखील सहभाग नोंदविला होता.

शासनाने शिवछत्रपती पुरस्कार देऊन तिचा सन्मान केला आहे. मात्र, पूर्वाला ऑलिम्पिकचे वेध लागले आहेत. तिथे खेळाचा नॉकआउट पंच मारण्याची जिद्द बाळगून आहे. त्यासाठी तिच्या परीने ती प्रयत्न व तयारी करीत आहे.

मात्र, तिथवर पोचण्यासाठी तिला आर्थिक रसद लागणार आहे. तिच्यापुढे अडचणी वाढल्या आहेत. त्यासाठी मार्गदर्शक कोच, ट्रेनिंग सेंटर, त्यांची भली मोठी फी भरण्यास पूर्वा असमर्थ ठरतेय. शासनाने अथवा एखादा प्रायोजक मिळाल्यास ती नक्की यशाला गवसणी घालेल, असा ठाम विश्वास तिला आहे. त्यासाठी या गुणवान व जिद्दी मुलीच्या कोणीतरी पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.

नक्की वाचा - बाबा, मी शाळेत जाऊ कशी?

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी आम्ही केली आहे. त्याचा आनंद वाटताे. आगामी काळात ऑलिंपिक स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी दैनंदिन सरावाबराेबरच अधिक कष्ट घेत आहे. याबराेबरच भविष्यातील आशियायी स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशिल राहणार आहे. 
- पुर्वा दीक्षित.



Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com