ताकारीच्या पाण्याचा ११० किलोमीटरचा प्रवास

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

वांगी - ताकारी लाभक्षेत्रातील सर्वच गावांना मुबलक पाणी पुरवून मंगळवार मध्यरात्रीनंतर ताकारी उपसा योजना बंद करण्यात आली. मुख्य कालव्याच्या कि.मी. ११० वर तासगाव तालुक्‍यातील पुणदीपर्यंत पाणी पोचविल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. 

ताकारी लाभक्षेत्रातील निम्मी-अर्धी पिके वाळून  गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या दररोजच्या आंदोलनानंतर ताकारी योजनेचे पाणी २९ नोव्हेंबरपासून वाहू लागले होते. हे पाणी ३ जानेवारी रोजी मध्यरात्रीपासून बंद करण्यात आले. दरम्यान काही तासांचा तांत्रिक व विद्युत बिघाड वगळता ताकारीचे पाणी अखंडपणे ३६ दिवस सुरू राहिले. वांगीपर्यंत २० कि. मी. वर पुरेशा दाबाने पाणी येण्यास आठ दिवस उलटले. या काळात सिंचन विभागाच्या उपअभियंता श्रीमती योगिता पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. यानंतर सुरवातीच्या क्षेत्राची तहान संपल्यानंतर पाणी गरजेनुसार टप्प्याटप्प्याने तासगाव तालुक्‍यातील पुणदीजवळ ११० कि.मी.च्या पुढे पोहोचविण्यात यश मिळविले. सोडण्यात आलेल्या या पाण्यामुळे काही प्रमाणात असलेल्या रब्बी पिकांना आणि पिण्याचे पाणी भरपूर उपलब्ध झाले आहे.

Web Title: takari water 110 km journey