सेतू कार्यालयातील मनमानी कारभारावर कारवाई करावी - राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

राजकुमार शहा 
बुधवार, 6 जून 2018

मोहोळ (सोलपूर) : जिल्ह्यातील सेतू कार्यालयातील सर्वच कारभार मनमानी पद्धतीने सुरू असुन. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे नियम पाळले जात नाहीत. सेतुमधल्या या मनमानी कारभारावर जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काॅग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ऋतुराज देशमुख यांनी आज जिल्हाधिकारी यांना भेटून केली. तशा आशयाचे निवेदन प्रशासनाला दिले आहे.

जून महिन्यात शाळा महाविद्यालय सुरू होतात. त्यासोबत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची गडबड सुरू होते. त्यामुळे प्रवेशासाठी लागणारे दाखले व विविध प्रकारची कागदपत्रके  काढण्यासाठी सरकारी  कार्यालयात गर्दी सुरू होते. वाढत्या गर्दीचा फायदा घेवून तहसील कार्यालयातील  विद्यार्थ्यांना लागणारे दाखले, कागदपत्रे काढून देण्यासाठी  विद्यार्थ्यांची व पालकांची  लूट केली जात आहे. विद्यार्थ्यांची ही लूट रोखण्यासाठी तक्रारी करून ही शासकीय पातळीवर काहीच प्रयत्न केले जात नाहीत. कागदपत्रे काढण्यासाठी सरकारी दरपत्रक असताना जादा पैसे घेताना मनमानी पद्धतीने कार्यालयातील अधिकारी पैसै मागत आहेत.संगणकाची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर कागदपत्रे मिळत नाहीत.अशी परिस्थिती जिल्ह्यातील सर्वच सेतु कार्यालयात  आहे.

या सगळ्यावर प्रशासनाने योग्य पाऊल उचलून कारवाई करावी . अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काॅग्रेसतर्फे  आंदोलन करण्यात येईल.यावेळी उत्तर सोलापूरचे रा.वि.काँ. तालुका अध्यक्ष अतिश बचुटे, अमोल शिंदे, सुमित सावंत, महेश शेंडगे, सुरजअभिवंत, बालाजी बचुटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: take action on setu office s arbitrary handling demand by rashtravadi youth