"एनएनएमएस परीक्षा डिसेंबर-जानेवारीमध्ये घ्या'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

सोळाकूर - या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता आठवीसाठी स्कॉलरशिप परीक्षा प्रथमच सुरू केली, मात्र एनएमएमएस शिष्यवृती परीक्षाही याच विद्यार्थ्यांना द्यावी लागते, त्यामुळे एकाचवेळी दोन्ही परीक्षांची तयारी करून घेताना शिक्षक व विद्यार्थी यांची प्रचंड धावपळ होत आहे.

सोळाकूर - या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता आठवीसाठी स्कॉलरशिप परीक्षा प्रथमच सुरू केली, मात्र एनएमएमएस शिष्यवृती परीक्षाही याच विद्यार्थ्यांना द्यावी लागते, त्यामुळे एकाचवेळी दोन्ही परीक्षांची तयारी करून घेताना शिक्षक व विद्यार्थी यांची प्रचंड धावपळ होत आहे.

नोव्हेंबर महिन्यात एनएमएमएस परीक्षा होणार आहे, तर शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. विद्यार्थ्यांची योग्य तयारी होण्यासाठी ही परीक्षा डिसेंबर अथवा जानेवारीमध्ये घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्गातून होत आहे. सन 2016-17 यास शैक्षणिक वर्षाचा आरंभ 15 जून 2016 ला झाला. विद्यार्थी शिष्यवृत्ती व एनएमएमएस परीक्षेच्या तयारी सहशालेय अभ्यासक्रम, घटक चाचणी क्रमांक एक, प्रथम सत्र परीक्षा, पायाभूत चाचणी, गणित प्रावीण्य आदी परीक्षांमध्ये गुंतल्यामुळे एनएमएमएस परीक्षेची तयारी पूर्ण करू शकले नाहीत. शिक्षक शालेय पोषण आहार ऑनलाइन माहिती, सरल डाटा माहिती, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती, मागील पात्र विद्यार्थी शिष्यवृती माहिती ऑनलाइन करणे इन्स्पायर ऍवॉर्ड एनएनएमएस परीक्षा फॉर्म भरणे समायोजन प्रक्रिया या कामात पहिल्या सत्रातील वेळ खर्च झाल्याने एनएनएमएस परीक्षा डिसेंबर अथवा जानेवारीमध्ये घेण्याची मागणी होत आहे. दुसरे सत्र 15 नोव्हेंबरला सुरू होत आहे. तर 20 नोव्हेंबरला राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृती म्हणजे एनएनएमएस परीक्षा होणार आहे. कोल्हापूर जिल्हा शिष्यवृतीमध्ये राज्यात अग्रेसर मानला जातो. या दोन शिष्यवृतींच्या परीक्षा प्रथमच एकाच वर्गासाठी होणार असल्याने परीक्षांच्या तयारी होण्यासाठी अवधी मिळावा म्हणून एनएनएमएस परीक्षा डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात घेण्याची मागणी पालक शिक्षक विद्यार्थी वर्गातून होत आहे.

Web Title: Take NNMS exams in December-January