मोहोळमध्ये लाच घेताना तलाठ्याला पकडले 

राजकुमार शहा 
मंगळवार, 15 मे 2018

मोहोळ - बिनशेती प्लॉटची नोंद धरुन ही जमिन पुढील कारवाईसाठी पाठविण्याच्या कामी मागीतलेली तीन हजाराची लाच स्विकारताना नरखेड येथील तलाठ्याना रंगेहात पकडण्यात आले. ही घटना नरखेड ता मोहोळ येथील तलाठी कार्यालयात मंगळवार ता 15 रोजी दुपारी सव्वाबारा वाजता घडली. साहिल शहाजहान पठाण (33) असे रंगेहात पकडलेल्या तलाठ्याचे नाव आहे 

या संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, नरखेड येथील रामचंद्र गरड यांच्या पत्नीच्या नावे नरखेड येथे बीनशेती प्लॉट आहे. त्या प्लॉटच्या दस्ताची ऑनलाईन नोंद धरून पुढील कारवाईसाठी पाठविण्याची विनंती गरड यांनी तलाठी पठाण यांच्या कडे केली. या कामासाठी तलाठी पठाण याने गरड यांच्या कडे तीन हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली. 

दरम्यान, गरड यांनी सोलापुर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधुन तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी अरूण देवकर यांच्या मार्गदर्शना खाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक कविता मुसळे, पोलिस निरीक्षक वैभव मारकड व पथकाने नरखेड येथील तलाठी कार्यालयाजवळ सापळा लावला दुपारी पठाण हे कार्यालयात गरड यांच्याकडुन लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहात पकडले.

Web Title: talathi arrestd in Mohol for taking bribe