लाच घेताना फलटण येथे तलाठी रंगेहात जाळ्यात

Talathi caught by Talathi at Phaltan While taking a bribe
Talathi caught by Talathi at Phaltan While taking a bribe

फलटण (जि. सातारा) : वडले (ता. फलटण) येथील तलाठी दत्तात्रय रामचंद्र धुमाळ यांना १ हजार ५०० रुपये लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीच्या पत्नीचे विहीर पाणी हक्काचे कायम खुश खरेदी दस्तांची नोंद ७/१२ वर करणेसाठी करण्यासाठी वडले येथील तलाठी  दत्तात्रय रामचंद्र धुमाळ (वय ४0, रा. अक्षत रेसडन्सी जाधववाडी, फलटण) यांनी तक्रारदार यांना २ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तडजोडीअंती १ हजार ५०० रुपये रक्कम ठरली. याबाबतची माहीती  तक्रारदार यांनी लाच लुचपत विभागाकडे तक्रर दाखल केली होती. त्यानुसार आज (ता.४) रोजी दुपारी गजानन चौक येथील व्होडाफोन मिनी स्टोअरच्या इमारती समोर सापळा कारवाईवेळी १ हजार ५०० हजाराची लाच स्विकारताना  त्यांना रांगेहाथ पकडण्यात आले. त्याच्या विरोधात फलटण शहर पोलिस स्टेशनला भष्ट्राचार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सातारा पोलिस उपाधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आरिफा मुल्ला व पो. हा भरत शिंदे, पो. ना. अजित कर्णे, विनोद राजे, पो. कॉ. विशाल खरात यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com