तानाजी मालुसरेंची मूर्ती देणार जवानांना प्रेरणा

सुधाकर काशीद
बुधवार, 19 डिसेंबर 2018

कोल्हापूर - काश्‍मीर सरहद्दीवर बोचऱ्या थंडीत देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना बळ देणारी जी काही प्रतीके आहेत, त्यांत छत्रपती शिवराय आणि त्यांच्यासाठी जिवाची बाजी लावणारे मावळे आहेत. आणि या मावळ्यांतला कलंदर मानल्या जात असलेल्या तानाजी मालुसरेंचे स्वराज्यासाठी योगदान तर मोलाचे आहे. अर्थातच सीमेवर लढणाऱ्या मराठा बटालियनच्या जवानांच्या ह्रदयात या तानाजीला खूप मानाचे स्थान आहे.

कोल्हापूर - काश्‍मीर सरहद्दीवर बोचऱ्या थंडीत देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना बळ देणारी जी काही प्रतीके आहेत, त्यांत छत्रपती शिवराय आणि त्यांच्यासाठी जिवाची बाजी लावणारे मावळे आहेत. आणि या मावळ्यांतला कलंदर मानल्या जात असलेल्या तानाजी मालुसरेंचे स्वराज्यासाठी योगदान तर मोलाचे आहे. अर्थातच सीमेवर लढणाऱ्या मराठा बटालियनच्या जवानांच्या ह्रदयात या तानाजीला खूप मानाचे स्थान आहे.

म्हणूनच काश्‍मीर सरहद्दीवर लढणाऱ्या मराठा बटालियनच्या जवानांना आणखी बळ देण्यासाठी तानाजी मालुसरेंची चांदीची मूर्ती त्यांच्या बटालियनच्या आवारात उभी केली जाणार आहे. ही मूर्ती कोल्हापुरात वसंतराव पाटील-राशिवडेकर सराफांच्या पेढीत तयार झाली आहे. 

ही मूर्ती जरूर सैनिकांना एक स्फूर्ती देणारी मूर्ती म्हणून त्या बटालियनमध्ये उभी राहील, पण या निमित्ताने कोल्हापुरातील चांदी कारागिरांचे कौशल्य देशाच्या सरहद्दीवर कायमस्वरूपी झळकत राहणार आहे.  या मूर्तीसाठी पृथ्वीराज व शिवाजी 
पाटील या बंधुनी कौशल्य पणाला लावले आहे. त्यांच्या पेढीचा चांदी कारागिरीत वेगळाच दबदबा आहे. यापुर्वी त्यांनी सरहद्दीवर सैनिकांच्या बटालियनमध्ये स्फुर्ती देणाऱ्या मुर्ती म्हणून छत्रपती शिवराय व बाजीप्रभू देशपांडे यांच्या मुर्ती तयार करून दिल्या आहेत.

त्यांच्या या कामाची दखल घेत तानाजी मालुसरेंच्या मुर्तीचे काम त्यांना मिळाले. या मुर्तीसाठी सात किलो दोनशे ग्रॅम चांदी वापरली आहे. पहिल्यांदा प्लॉस्टरची मुर्ती त्यानंतर ॲल्युमिनियमचे कास्टिंग व त्यानंतर चांदीचे काम अशा टप्याने हे काम दोन ते अडिच महिन्यात झाले. सुनील दामुगडे कारागिराने त्यासाठी महत्वाचा वाटा उचलला. प्रत्येक टप्यावर हे काम होत असताना ते संबधित अधिकाऱ्यांना फोटो, व्हिडीओच्या व्दारे दाखवले. व नंतर त्याला अंतिम स्वरूप दिले गेले. ही मुर्ती चबुतऱ्यासह साधारण चार फुट सहा इंच आहे. 

सैनिकांवर शौर्याचा प्रभाव
तानाजी मालुसरेंचे शौर्य खूप मोठे आहे. सिंहगडच्या लढाईत त्यांनी प्राणाची बाजी लावली. त्यांच्या शौर्याने आम्ही प्रभावित आहोत. म्हणूनच '१५ मराठा (बुर्ज) मराठा बटालियनच्या सर्वांत दुर्गम कृष्णा घाटीवर ही मूर्ती आम्हा जवानांना प्रेरणा देत राहील,' असा मजकूर मूर्तीच्या चबुतऱ्यावर आहे. 

देशाच्या जवानांसाठी काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. तानाजीची ही मूर्ती बनवताना त्या मूर्तीचे तेज व त्यात अंगार जाणवेल याची काळजी घेतली. आम्ही देशासाठी लढायला सरहद्दीवर जाणार नाही, पण जवानांना बळ देण्यासाठी थोडेफार करू शकलो हे आमचे भाग्य आहे.
- पृथ्वीराज व शिवाजी पाटील,
चांदी मूर्तिकार.

Web Title: Tanaji Malusars idols Inspiration to the jawans