तब्बल १८ तासात साकारला 'तान्हाजी'

दिवंगत गोपाळदादा पाटील, अशोक नारे यांना रांगोळीव्दारे वाहिली श्रद्धांजली
तब्बल १८ तासात साकारला  'तान्हाजी'
तब्बल १८ तासात साकारला 'तान्हाजी'sakal

बेडकिहाळ : बेडकिहाळ दसरा महोत्सवानिमित्त येथील कर्तव्य फौंडेशनच्या वतीने श्रीमती कुसुमावती मिर्जी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात भव्य रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्यात कलाकारांनी विविध प्रकारच्या पंधरा रांगोळी रेखाटल्या आहेत. 'तानाजी' ही रांगोळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. सोमवारी (ता. १८) सायंकाळी अखेर प्रदर्शन खुले राहणार आहे.

डॉ. राजू जोशी यांच्या हस्ते, इंद्रजीत पाटील, दत्तकुमार पाटील, सुप्रिया पाटील, सुनील नारे व मान्यवरांच्या उपस्थितीत रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

देवरुख-रत्नागिरी येथील

कलाकार विकास राहटणी यांनी तब्बल १८ तासात १० बाय १५ आकारात 'तान्हाजी' ही रांगोळी साकारली. तिला पाहण्यासाठी गर्दी होत आहे. दिवंगत ज्येष्ठ नेते गोपाळदादा पाटील व अशोक नारे यांना रांगोळीतून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. पद्मजा गोरवाडे, समृद्धी देसाई, साक्षी पाटील, गायत्री कुंभार, स्वाती शिंदे यांच्यासह कलाकारांनी रांगोळी साकारल्या आहेत. प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील रसिक, महिला व नागरिकांची गर्दी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com