‘तनिष्कां’च्या पुढाकाराने टंचाईवर मात

रूपेश कदम
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

मलवडी - माण तालुक्‍यातील जलसंधारण चळवळीला सकाळ रिलीफ फंडाची मोलाची साथ मिळाली आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या तनिष्का महिला गटांची चळवळ माणमधील अनेक गावांत सुरू आहे. माणमधील पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी तनिष्कांनी पुढाकार घेतला. तनिष्कांनी मदतीची हाक दिल्यावर ‘सकाळ’चा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे नऊ गावांत तलाव किंवा बंधाऱ्यातील गाळ काढण्याच्या कामातून पाणी प्रश्‍नाची तीव्रता कमी झाली.

माणमधील सर्वांत भेडसावणारी समस्या म्हणजेच पाणीटंचाई. या समस्येवर मात करण्यासाठी प्रत्येक जण आपल्यापरीने प्रयत्न करतो. विविध गावांतील तनिष्का गटांनी सकाळ रिलीफ फंडाकडे माणगंगा नदी, ओढे तसेच पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामासाठी मदत मागितली. त्यानुसार दहिवडी, पांगरी, मोगराळे, राजवडी, दानवलेवाडी, भांडवली, रांजणी, पांढरवाडी, गोंदवले बुद्रकु या नऊ गावांमध्ये तब्बल १८ लाख रुपयांचा निधी देण्यात आला. गाळ काढल्यामुळे त्या-त्या ठिकाणी पाणीसाठा वाढण्यास मदत झाली. त्यासोबतच कसदार गाळ शेतात टाकल्यामुळे जमीन सुपीक होण्यास मदत झाली.

भांडवलीतील वाघजाई तलाव, दहिवडी-माणगंगा नदीवरील बंधारा, पांगरी-माती नालाबांध, मोगराळे-गावाशेजारील माती नालाबांध, राजवडी, दानवलेवाडी, रांजणी येथील पाझल तलाव, पांढरवाडीतील ओढा व गोंदवले बुद्रुकमधील बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून मदत झाली.

सकाळ रिलीफ फंडामार्फत मोरदरा येथील पाझर तलावातील गाळ काढण्यात आला. त्यामुळे पाणीसाठा वाढला. शेतीही सुपीक झाली. वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे शेतीला व पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले. 
- शीला दडस, तनिष्का गटप्रमुख, पांगरी

Web Title: tanishka Water conservation sakal relief fund pazar lake water storage