Chandrashekhar Bawankule : उरलेली राष्‍ट्रवादी तासगावमधूनही संपवा

‘तासगावपासून साडेतीन जिल्ह्यापुरती उरली सुरली राष्ट्रवादी संपवण्याचा निर्धार करा,’ असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.
chandrashekhar bawankule
chandrashekhar bawankulesakal

तासगाव - ‘तासगावपासून साडेतीन जिल्ह्यापुरती उरली सुरली राष्ट्रवादी संपवण्याचा निर्धार करा,’ असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले. तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भाजपच्या पाठीशी उभे रहा, असे आवाहनही त्यांनी केले. भाजपच्या ‘महाविजय २०२४-जनसंपर्क ते जनसंवाद’ यात्रेत ते बोलत होते.

खासदार संजय पाटील, पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, युवक नेते प्रभाकर पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आणि तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी या यात्रेत सहभागी झाले होते.

गणपती मंदिर पासून बागणे चौक पर्यंत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी १२३४ नागरिकांशी संवाद साधला. त्यांना तुम्हाला कोण पंतप्रधान झालेले आवडेल? असे प्रश्न विचारले. अनेक महिलांनी त्यांचे ओवाळून स्वागत केले. तालुक्यातील अनेक समाजांच्या आणि सामाजिक संघटनानी त्यांचे स्वागत केले. संवाद यात्रेपूर्वी त्यांनी साने गुरुजी नाट्यगृहात तासगाव-कवठेमंकाळ खानापूर-आटपाडी आणि जत मतदार संघातील बूथ वॉरियर्स यांच्याशी बैठक घेऊन संवाद साधला.

जनसंपर्क यात्रेनंतर झालेल्या सभेत देशाध्यक्ष बावनकुळे यांनी महिलांना 33 टक्के आरक्षण देणाऱ्या, कोरोना काळात १४० कोटी जनतेला मोफत कोरोना लस देणाऱ्या, ३७० वे कलम दूर करणाऱ्या, चांद्रयान पाठवून भारताची प्रतिष्ठा जगात उंचावणाऱ्या, नागरिकांना पाच लाखाचे आरोग्य विमा संरक्षण देणाऱ्या, अयोध्या मध्ये श्रीराम मंदिर उभे करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले.

खासदार पाटील म्हणाले,‘‘ गेली ३२ ते ३४ वर्षे मी मोठ्या शक्तीशी संघर्ष करतोय ते केवळ सर्वसामान्य जनतेच्या बळावर. मी त्यांची सेवा करणारा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून हजारो कोटी रुपये मिळाले पाणी योजना मार्गी लागल्या काही कामे मागे राहिली आहेत. उर्रवरीत कामेही लवकरच मार्गी लागतील.’’

पवार, जयंतरावांवर टिका...

वक्त्यांनी साडेतीन जिल्ह्याचे पंतप्रधान, भावी पंतप्रधान अशा शेलक्या शब्दात शरद पवार यांच्यावर टीका केली. आमदार पडळकर यांनी जयंत पाटील यांना लक्ष्य केले. ते म्हणाले,‘‘ माणसं आणि आमदार नसलेल्या पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष असून पालकमंत्री जिल्ह्याचे मात्र निधी फक्त त्यांच्या तालुक्यात असे ‘मविआ’च्या काळातील चित्र होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com