शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्याबाबत पुन्हा काथ्याकूट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

सांगली - शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत रोजची दुकानदारी बंद करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी जाहीर केलेल्या धोरणांबाबत आज पुन्हा पदाधिकारी- अधिकाऱ्यांची बैठक झाली. 131 शिक्षकांची संमती 24 तासांत 104 पर्यंत खाली आहे. प्रत्यक्षात यादी प्रसिद्ध करून हजर करून घेण्यापर्यंतच्या कालावधीत किती बदल होणार, याची आता चर्चा सुरू झाली आहे. सीईओं भोसले यांनी घेतलेला निर्णय नियमाप्रमाणे असेल तर मग पुन्हा त्यावर काथ्याकूट करून काय साध्य होणार, हे अनाकलनीय आहे.

वर्षभर आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात येणाऱ्या-जाणाऱ्या शिक्षकांबाबत शासनाच्या निर्णयानुसारच करण्याचे धोरण मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी जाहीर केले. त्यानंतर अध्यक्षा स्नेहल पाटील, उपाध्यक्ष रणजित पाटील, बांधकाम सभापती भाऊसाहेब पाटील, कृषी सभापती संजीव सावंत, माजी उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण जाधव आदींच्या उपस्थितीत आज बैठक झाली.

आंतरजिल्हा बदल्यांबाबत लावलेल्या निकषावर पुन्हा-पुन्हा चर्चा करण्यात येत आहे. सीईओ डॉ. भोसले आपल्या मतावर ठाम राहिले. मात्र पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

जिल्ह्यात 171 शिक्षकांच्या रिक्त जागा असून आता नव्या निर्णयानुसार 104 जागाच रिक्त आहेत. उर्वरित 67 जागा एसटी आणि अन्य प्रवर्गातील उमेदवार न मिळालेल्यांसाठी राखीव आहेत. सांगली जिल्ह्यातून संमत्ती दिल्यानंतर एखाद्या जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षक संबंधित झेडपीने सोडले तर त्यांना हजर करून घेण्याची भूमिका शिक्षणाधिकारी वाघमोडे यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: teacher inter district transfer issue