राज्यातील शिक्षकांचे वेतन ‘शालार्थ’मधूनच

Teacher
Teacher

सोलापूर - राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या वेतनासाठी ‘शालार्थ’ ही संगणकीय प्रणाली सुरू केली होती. मात्र, जानेवारी २०१८ पासून ती बंद आहे. पण, आता पुढील महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन ‘शालार्थ’ प्रणालीमधूनच करण्याचा विचार शिक्षण विभाग करीत आहे. 

त्यामुळे त्या प्रणालीत नावनोंदणीसाठी पुण्यातील हडपसरमध्ये १ जुलैपासून शिबिर होणार आहे. त्यात शिक्षकांचे नाव न नोंदल्यास मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाणार आहे. ही प्रणाली बंद पडण्यापूर्वी त्यातून वेतन होणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शेवटच्या महिन्याच्या वेतनाची झेरॉक्‍स प्रत द्यायची आहे. त्याची वेतन पथक अधीक्षकांनी पडताळणी करायची आहे. या प्रणालीमध्ये आयडी न मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी या शिबिरामध्ये नव्याने आयडी घ्यावयाचा आहे. ‘शालार्थ’मध्ये २० टक्के अंशतः अनुदानित असलेल्या शाळांमधील कर्मचाऱ्यांनाही आयडी दिला जाणार आहे. राज्यातील १ हजार ६२८ शाळांमधील शिक्षकांना जानेवारी २०१८ पूर्वी आयडी मिळालेला आहे, अशी माहिती सोलापूरचे वेतन पथक अधीक्षक (माध्यमिक) अमोल पवार यांनी ‘सकाळ’ला दिली.

प्रणालीत नावनोंदणीसाठी एक जुलैपासून शिबिराचे आयोजन केले आहे. ‘शालार्थ’ आयडी काढण्यासाठी आवश्‍यक असलेली माहिती घेऊन मुख्याध्यापकांनी या शिबिरासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पुण्याच्या शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी केले आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी पुणे, नगर, सोलापूर या जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com