शिक्षकांअभावी वर्ष धोक्‍यात

राजेंद्र दळवी
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

आपटी - शैक्षणिक वर्षाची सुरुवात होऊन दोन महिने झाले तरी पन्हाळा तालुक्‍यात ५६ शिक्षक, २८ पदवीधर शिक्षक, १८ मुख्याध्यापक, ११ केंद्रप्रमुख अशी तब्बल ११३ इतकी पदे रिक्त आहेत. शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याचा धोका आहे. 

आपटी - शैक्षणिक वर्षाची सुरुवात होऊन दोन महिने झाले तरी पन्हाळा तालुक्‍यात ५६ शिक्षक, २८ पदवीधर शिक्षक, १८ मुख्याध्यापक, ११ केंद्रप्रमुख अशी तब्बल ११३ इतकी पदे रिक्त आहेत. शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याचा धोका आहे. 

तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या १९४ शाळा आहेत. ५९५ शिक्षक पदे मंजूर आहेत. पैकी ५३८ शिक्षक कार्यरत असून कन्या पोर्ले, माजगाव, वाळवेकरवाडी, कोतोली, इंजोळे, खडेखोळवाडी, दळवेवाडी, खोतवाडी, चिखलकरवाडी, उंड्री, कुमार कोडोली, कन्या केखले, खामणेवाडी, नवलेवाडी, म्हाळुंगे, पानारवाडी, जाफळे शाळेत प्रत्येकी एक शिक्षक तर सातार्डे, कोलोली, तिरपण, बांदिवडे, कन्या माले, वेतवडे, वाघुर्डे, आकुर्डे, मरळी, माजनाळ, गोठे, बोरगाव, पोहाळे तर्फ बोरगाव, पोहाळवाडी, वाळोली, पोर्ले तर्फ बोरगाव, बाजार भोगाव, पाटपन्हाळा, किसरूळ, वाडी रत्नागिरी शाळेत प्रत्येकी दोन शिक्षक असे ५६ शिक्षक कमी आहेत. १९४ पदवीधर शिक्षकांपैकी १६६ कार्यरत आहेत. कन्या पोर्ले, गोलीवडे, कुमार यवलूज, केंद्रशाळा
सातवे, देसाईवाडी, बाजार भोगाव, सुळे, पोहाळवाडी, वाळोली, जिऊर शाळेत प्रत्येकी एक, तर सावर्डे, बहिरेवाडी, कन्या केखले, दळवेवाडी, नणुंद्रे, खापणेवाडी, कोलिक, पणोरे, मल्हारपेठ शाळेत प्रत्येकी दोन असे २८ पदवीधर शिक्षक कमी आहेत.

४५ मुख्याध्यापक पदे मंजूर आहेत पैकी २७ ठिकाणी मुख्याध्यापक असून कुशिरे, कन्या आसुर्ले, कन्या पोर्ले, आळवे, वाघवे, कन्या यवलूज, बोरपाडळे, मोहरे, पुशिरे बोरगाव, पोहाळे बोरगाव, पणोरे, हरपवडे, आकुर्डे, कन्या कळे, घरपण, पाटपन्हाळा, बाजार भोगाव, पिसात्री या शाळा मुख्याध्यापकाविना चालू आहेत. अशीच तऱ्हा केंद्रप्रमुखांची असून मंजूर असलेल्या १८ पदांपैकी तब्बल ११ पदे रिक्त आहेत. काही शाळांत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तात्पुरते शिक्षक दिले आहेत.

तालुक्‍यातील बहुतांश शाळेत दोन वर्ग एकत्र केले आहेत. त्यामुळे शिक्षकांना अध्यापन करताना मर्यादा येत आहेत.

दर्जा खालावला
गेल्या काही वर्षांत पन्हाळा परिसरात नावाजलेल्या खासगी संस्थांनी, दर्जेदार शैक्षणिक सुविधांनी सुसज्ज शाळा उभारून पन्हाळा परिसर शैक्षणिक हब म्हणून नावारूपाला आणला आहे. स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्जा मात्र दिवसेंदिवस खालावतानाच दिसत आहे.

दृष्टिक्षेपात
 जि.प.च्या एकूण शाळा १९४ 
 मंजूर शिक्षक ५९५ 
 हजर शिक्षक ५३८

Web Title: teacher school student education