शिक्षकांच्या २२ मेपासून बदल्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

ऑनलाइन प्रस्ताव भरणे सुरू; सर्व्हर डाउन होत असल्याने मानसिक त्रास

सातारा - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या बदली प्रक्रियेला २२ मे पासून सुरवात होणार असून, त्यात आंतरजिल्हा बदलीसह प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांनी ऑनलाइन पद्धतीने माहिती भरण्यास सुरवात केली आहे. मात्र, सातत्याने सर्व्हर डाऊन होणे, माहिती अपलोड न होण्याचे प्रमाण वाढले असल्याने माहिती भरण्यास मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता आहे. 

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक विभागाकडून दर वर्षी समायोजनाने शिक्षक बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येत होती. या वर्षापासून ग्रामविकास विभागाने या प्रक्रियेत बदल केला आहे. त्यात प्रामुख्याने अवघड क्षेत्राची माहिती मागवून त्यानुसार प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. संपूर्ण बदली प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. बदलीस पात्र, तसेच विनंती बदलीसाठी शिक्षकांनी माहिती ‘स्टॉफ पोर्टल’वर ऑनलाइन भरावयाची असून, त्यानुसार प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही बदली प्रक्रिया २२ मेपासून सुरू होणार आहे. प्रामुख्याने यंदापासून चार संवर्गानुसार बदल्या करण्यात येणार आहेत. यात दुर्गम (अवघड) क्षेत्राकरिता बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक, विशेष संवर्ग भाग एक आणि भाग दोन, तसेच ज्यांना एका ठिकाणी दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत; अशा बदलीस पात्र शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. 

शिक्षक बदली प्रक्रियेसाठी आंतरजिल्हा बदलीकरिता इच्छुक शिक्षकांकडून ऑनलाइन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन माहिती आठ मे या दरम्यान सादर करावयाची होती. मात्र, सर्व्हेर डाऊन होणे, ऑनलाइन माहिती अपलोड करण्यास अनेक अडचणी येत असल्याने अद्यापही सर्वांनी माहिती भरली गेली नाही. त्यामुळे त्यास मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता शिक्षण विभागातून व्यक्‍त करण्यात आली. 

उन्हाळी सुटीला मिळाली ‘सुट्टी’!
ऑनलाइन माहिती भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याने शिक्षकांना उन्हाळी सुटीचा आनंद घेणेही दुरापास्त झाले आहे. सुट्टीच्या दिवशी तास न्‌ तास ऑनलाइन माहिती भरावी लागत आहे. त्याशिवाय, माहिती अपलोड होत नसल्याने, सर्व्हरच्या समस्या असल्याने मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. ही प्रक्रिया कशी पार पडणार, याबाबतही शिक्षकांतून साशंकता व्यक्‍त होत आहे.

Web Title: teacher transfer from 22nd may