
सांगली: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांना दिवाळीपूर्वी मुहूर्त लागण्याची चिन्हे दिसत आहेत. परीक्षेचा कालावधी असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास या बदल्या पुन्हा रेंगाळणार का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.