शिक्षकांची बदल्यांसाठी रदबदली, राजकारण्यांचा लय त्रास... शिक्षक परिषदेची खंत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

नाशिक येथे राज्य शासनाने नियुक्त केलेल्या बदली अभ्यास गटासमोर शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी काल (गुरुवारी) शिक्षक परिषदेची भूमिका मांडली. अभ्यास गटाचे अध्यक्ष आयुष प्रसाद उपस्थित होते. 
 

टाकळी ढोकेश्वर : बदली धोरणात कोणत्याही पद्धतीने राजकीय हस्तक्षेप व्हायला नको, बदल्या ऑनलाइन पद्धतीनेच व्हाव्यात, त्या फक्त राज्यस्तरावरून न करता जिल्हास्तरावरूनच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सनियंत्रणाखाली व्हाव्यात, अशी मागणी शिक्षक परिषदेतर्फे करण्यात आली आहे. 
नाशिक येथे राज्य शासनाने नियुक्त केलेल्या बदली अभ्यास गटासमोर शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी काल (गुरुवारी) शिक्षक परिषदेची भूमिका मांडली. अभ्यास गटाचे अध्यक्ष आयुष प्रसाद उपस्थित होते. 
ठुबे म्हणाले, ""बदल्यांना मर्यादा घालावी. सरसकट बारा हजारांपैकी पाच-सहा हजार शिक्षकांच्या बदल्या दर वर्षी करणे योग्य नाही. त्यासाठी बदल्यांचे प्रमाण एकूण शिक्षकांच्या पाच किंवा सात टक्के ठेवण्यात यावे. चुकीच्या पद्धतीने झालेल्या बदल्या दुरुस्त करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जिल्हास्तरावर असावेत.

तक्रार बदल्या वर्षभर केव्हाही करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना असावेत. एखाद्या शिक्षकाची अपवादात्मक तक्रार झाल्यास बदलीचा अधिकार नसल्यामुळे या शिक्षकावर अन्याय होऊन त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येते.

आंतरजिल्हा बदलीत पती-पत्नी एकत्रीकरणाला महत्त्व द्यावे, तसेच नक्षलग्रस्त जिल्हे गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांच्या आंतरजिल्हा बदल्या प्राधान्याने कराव्यात.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers argue for transfer