साथी हात बढाना : शिक्षक,पाेलिसांह टाेल नाका व्यवस्थापन सरसावले भुकेलेल्यांसाठी

साथी हात बढाना : शिक्षक,पाेलिसांह टाेल नाका व्यवस्थापन सरसावले भुकेलेल्यांसाठी

औध : सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातल्याने ग्रामीण भागातील जनताही यामधून होरपळून निघाली आहे. लाँकडाऊन मुळे हाताला काम नाही जगायचे कसे असा प्रश्न औंध गावातील हातावर पोट असणाऱ्या अनेक कुटुंबासमोर निर्माण झाला होता मात्र औंध गावातील प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक,प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गावातील गरजू कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी हात पुढे केले. यामध्ये सुमारे साठ शिक्षकांनी एका दिवसात मदत गोळा केली. 

औंध गावातील महात्त गल्ली, मारूती गल्ली, मातंग वस्ती, सटवाई नगर,गोटेवाडी,कुंभार गल्ली, बौद्ध समाजातील सुमारे 80 गरजू कुटुंबांना दहा ते पंधरा दिवस पुरेल एवढया जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले. प्रारंभी औंधचे सपोनि उत्तम भापकर यांच्या हस्ते जीवनावश्यक साहित्याचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले.

त्यानंतर सर्व शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन या साहित्याचे वाटप केले. तसेच कोरोनाच्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, स्वच्छता बाळगण्याचे तसेच प्रत्येक व्यक्तीने होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचे आवाहन केले. सर्व शिक्षकांनी दिलेल्या जीवनावश्यक साहित्यामुळे 80कुटुंबातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान शिक्षकांनी राबविलेला या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून या उपक्रमातून प्रेरणा घेऊन समाजातील अनेक घटक मदतीसाठी पुढे येऊ लागले आहेत.


वहागाव : कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर देशात लागू केलेल्या कलम १४४ व लाॅकडाऊनमुळे प्रवासी वाहतूक बंद असल्याने सातारा बाजूकडून कर्नाटक बाजूकडे व कर्नाटक बाजूकडे तामिळनाडूकडे पायी चालत निघालेल्या मजूरांसाठी तासवडे (ता. कऱ्हाड) येथील टोल व्यवस्थापनाच्यावतीने सामाजिक बांधिलकीतून या परप्रांतीय मजूरांच्या मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे. 

कोरोना आजारामुळे जगभरात हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या गंभीर स्थितीमुळे देशवासियांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देशात लाॅकडाऊन करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही घरातून बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. या सर्व प्रकारामुळे नोकरी, उद्योगधंद्यामुळे बाहेर असणाऱ्या लोकांची गैरसोय होत असल्याचे दिसत आहे. 

साताऱ्यासह नजीकच्या अनेक कंपन्या व व्यवसाय लाॅकडाऊनमुळे बंद झाल्याने त्यातील चाकरमानी पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावरुन आपल्या घराकडे परतू लागले आहेत. दरम्यान प्रशासनाने प्रवासी वाहतूक बंद केली असल्याने हे मजूर वर्ग परिसरातील महामार्गावरून व राज्य मार्गावरुन आता पायी चालत जाताना दिसत आहेत. कराड - उंब्रज मार्गावरुन असा प्रवास करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. दरम्यान या मजूरांच्या सोयीसाठी येथे प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे दिसत आहे. 

दरम्यान पायी चालत निघालेल्या मजूरांसाठी जेवणाची सोय नसल्याचे तासवडे टोलचे व्यवस्थापक रमेश शर्मा यांच्या लक्षात येताच त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या कर्तव्य भावनेतून तासवडे टोलनाक्यावर या मजूरांसाठी मोफत जेवणाची सोय केली आहे. जेवण झाल्यावर हे प्रवासी टोल व्यवस्थापनाला धन्यवाद देत आहेत. यावेळी तासवडे टोलचे व्यवस्थापक रमेश शर्मा, निलेश पाटील, तळबीड पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक जयश्री पाटील यांच्यासह पोलिस व टोल कर्मचारी उपस्थित होते.

यापुढील काळातही टोल व्यवस्थापनाच्यावतीने या पायी चालत प्रवास करणाऱ्या गरजू लोकांना तासवडे व किणी टोलनाक्यावर मोफत जेवण देणार असल्याचे रमेश शर्मा यांनी सांगितले. तासवडे टोल परिवाराच्यावतीने मजूरांसाठी मोफत जेवणाची सोय केलेल्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. 

JantaCerfew : आता सातारा जिल्ह्यातील या शहरात पुन्हा दाेन दिवस जनता कर्फ्यू

कऱ्हाड ः
कोरोनाच्या भितीने सध्या अनेक मजुरांनी आपल्या गावाकडची वाट धरली आहे. अनेकजण ना भुकेची, ना पाण्याची चिंता करताच जीवाच्या भितीने अनेक मैलांचे अंतर पायी चालत निघाले आहेत. त्यांना आहे तीथेच थांबवा आणि त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था करा, असे आदेश शासनाने दिले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांनाही वाईट दिवस आले आहेत. त्यामुळे पोलिसांनी तब्बल 200 मजुरांना त्यांनी सामाजीक बांधीलकीतुन जेवण दिले तर कऱ्हाड पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव यांनी शहरातील नागरीकांना मदतीचे आवाहन केले. त्यानुसार केवळ पाच तासात हजार किराणा मालाची किट जमा झाली. त्याचे वाटप आजपासुन गरजुंना सुरु झाले आहे. कऱ्हाड पोलिस व नागरीकांच्या या माणुसकीची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.

कोरोनामुळे सध्या सर्वत्र हाहाकार उडाला आहे. सर्वत्र लॉकडाऊऩमुळे बंद आहे. आत्यावश्यक सेवा वगळता सावर्जनिक वाहतुकही बंदच आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सध्या सर्वच व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटकातुन कामासाठी आलेल्या संबंधित मजुरांना व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने मालकांनी कामगारांना घरी जाण्यास सांगितले आहे. त्यामुळे अनेकजण बोजाबिस्तारा घेवुन घराचा रस्ता धरला आहे. इथे राहुन उपवाशी राहण्यापेक्षा घरीतरी पोचु या हेतुने अनेक मजुर सध्या आपल्या गावी जाण्यासाठी बाहेर पडले आहेत. भुकेची, पाण्याची, मुक्कामाची, राहण्याची काळजी न करताच अनेकजणांनी घरी जाण्यासाठी वाहने नसल्याने चालतच घराचा रस्ता धरला आहे. त्या मजुरांनी आत्तापर्यंत अनेक किलोमीटरची पायपीट केली आहे. अनेकांचे चालुन चालुन पायही सुजले आहेत. त्याचा विचार करुन शासनाने संबंधितांना आहे तीथेच थांबवुन त्यांच्या जेवणाची व निवाऱ्याची सोय करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव, कऱ्हाडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, तालुका पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, उंब्रजचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड, तळबीडच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक जयश्री पाटील व पोलिसांनी कऱ्हाड तालु्क्यातुन इतर राज्यात निघालेल्या मजुरांच्या भुकेल्या पोटाचा आधार बनुन त्यांना जेवण व किराणा माल देण्याचे शिवधनुष्य उचलले आहे.  

पोलिसांचे दानशुरांना मदतीचे आवाहन  

कोरोनामुळे सध्या अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामध्ये परराज्यातील मजुरांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर हातावर पोट असणाऱ्यांनाही सध्या किराणा मालाची गरज आहे. त्याचा विचार करुन त्यांना ते जिथे आहेत तेथेच धान्य, किराणा माल, जेवण मिळावे यासाठी पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव यांनी पुढाकार घेवुन नागरीकांना मदतीचे आवाहन केले आहे. त्यासाठी डाळ, तांदुळ, तेल, चटणी, मीठ, काडीपेटी आदी वस्तुंचे कीट द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यानुसार राजस्थानी सेवा संघासह अन्य दानशुरांनी त्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसादही मिळाला असुन आजपासुन किराणा मालाच्या कीटचे वाटप सुरु करण्यात आले आहे.

पाच दिवसांपासून टपाल कार्यालयातील कामकाज ठप्प; बीएसएनलचे दुर्लक्ष 

कोयना विभागातील १५ लमाणी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली

काेयनानगर : कोरोनो व्हायरस या विषाणुची भिती व त्यामुळे लागू झालेल्या संचारबंदीमुळे हातावर पोट असणाऱ्याना वाईट दिवस आले आहेत.हाताला काम मिळावे यासाठी खूप लांबचा पल्ला पार करत पाटण तालुक्यातील कोयना विभागात आलेल्या १५ लमाणी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.संचार बंदीमुळे ठेकेदाराने पाठ फिरवल्यामुळे पैसे नाहीत.लॉकडाऊन संपायला वेळ असल्याने शिल्लक असणारे अन्नधान्य संपु नये यासाठी ही कुटुंब एकवेळ जेवणावर आपला उदरनिर्वाह भागवत आहेत.भुकेल्या पोटाला आधार बनण्याचे  काम कोयना वासीय करत आहेत.

 सध्याच्या आप्त्कलीन परस्थितीत इतर राज्यातून आपले व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी विजापूर येथून कोयना विभागात आलेल्या 15 लमाणी कुटुंबाला वाईट दिवस आले आहेत.कोयनानगर येथील गणपती मंदिरात जवळ झोपडया ,राहुटया मध्ये राहत आहेत.दगड 
फोडणा-या व कष्टाळू जीवन जगणा-या या कुटुंबाला आणणारे ठेकेदार हा परागंदा झाला आहे.यामूळे या कुटुंबाना अन्नधान्य खरेदी करण्यासाठी पैशाची गरज भासत आहे. पैसे नसल्याने त्यांच्याकडे असणारे अन्नधान्य संपत आले आहे. यामूळे त्या॑नी एकवेळ जेवण करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत आहेत.त्यांच्या चिल्यापिल्या उपासमारीचा सामना करावा लागत आहे.

उपासमारी त्रस्त असणाऱ्या या भुकेल्या पोटाचा आधार कोयना सिय झाले आहेत. किराणा मालासह जेवण या कुटूबांना देवून कोयनावासिय आपली सामाजिक बांधिलकी जपत आहेत. कोयना पोलीसांनी या कुटुंबाना धान्य वितरण केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com