चिखलठाणच्या शिक्षकाची सिडबॅंक देशविदेशात फेमस्‌ 

चिखलठाणच्या शिक्षकाची सिडबॅंक देशविदेशात फेमस्‌ 

चिखलठाण : चिखलठाण (जि. सोलापूर) च्या प्राथमिक शाळेतील शिक्षक विवेक पाथ्रुडकर यांच्या गावरान व देशी-विदेशी बियांचा संग्रह करण्याच्या छंदातून त्यांनी सिडबॅंकच साकारली असून ते फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून विविध प्रकारच्या बियांची देवाणघेवाण करत अस्सल देशी बियानांचे संवर्धन करत आहेत. सध्या त्यांच्या ग्रुपच्या बॅंकेत 300 पेक्षा ज्यास्त प्रकारच्या बियांचा संग्रह असून दिवसोंदिवस यामध्ये वाढच होत आहे. 

सध्या अनेक गावरान देशी फळे, भाज्या, पिके, फुले आशा विविध वनस्पतींचे वाण दुर्मिळ व नामशेष होण्याच्या मार्गावर आसल्याची ओरड आपणास सर्वत्र ऐकण्यास मिळते. यांच्या संग्रह व संवर्धन करण्याचे फारसे प्रयत्न कोणी करत नाहीत. मात्र चिखलठाण क्रमांक दोन येथील उपक्रमशील शिक्षक विवेक पाथ्रुडकर यांच्या जवळ तब्बल तीनशे अस्सल देशी वाणाच्या बियाणांचा संग्रह आहे. ज्या वनस्पतींना बिया नाहीत त्यांची रोपे तयार केली आहेत. तसेच जेऊर येथील त्यांच्या घराच्या टेरेसवर आशा वनस्पतींची बागही फुलवली आहे. गेल्या तीनचार वर्षांपासून ते आपल्यजवळील बिया व रोपे यांची आपल्या परिचयाच्या व याची आवड आसणारांशी देवाणघेवाण करत होते. प्रमोद तांबे यांच्या फेसबुकवरील 'माती विरहीत बाग' या ग्रुपपासून त्यांना आणखी समविचारी नवीन मित्र मिळाले. यातूनच 5 फेब्रुवारी 2019 रोजी त्यांनी स्वत: व नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील संजय नरोटे, बीड येथील श्रुती ओझा या तीन समविचारी मंडळीनी एकत्र येऊन तिघांच्या नावातील अध्याक्षर घेऊन एस. व्ही. एस सीडबॅंक फेसबुक ग्रुपची व सिडबॅंकेची निर्मिती केली. या ग्रुपचे संपूर्ण देश व परदेशात पाच हजारांच्यावर सभासद आहेत. सध्या या तिघांजवळ विविध प्रकारच्या दुर्मिळ वनस्पतींची बीया उपलब्ध असून राज्याच्या काना कोपऱ्यातील सभासद मंडळींना याची देवाणघेवाण करतात पोष्टाच्या माध्यमातून पाकिटाद्वारे ना नफा ना तोटा या तत्वावर करत आहेत. आजपर्यंत महाराष्ट्रच नव्हे तर तामिळनाडू, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश, हरियाणा राज्यात बियांची देवाणघेवाण केली आहे. याशिवाय फिलाडेल्फिया येथून तिथे पिकणाऱ्या लालमका आणि सूर्यफूल आशा बियांची सिडबॅंकेत भर पडली आहे. एखाद्याने फेसबुकवर विशिष्ट प्रकारच्या बियांची मागणी केली असता ते पोस्टाने या बिया पाठवतात. त्याबदल्यात त्यांनाही वेगवेगळ्या ठिकाणची मंडळी त्या परिसरातील गावरान व देशी वनस्पतींच्या बिया पाठवतात. आपली शाळा संभाळून ते राबवत आसलेल्या उपक्रमात त्यांची पत्नी व कुटूंबातील सर्व सदस्य मदत करत आसतात त्यांच्या या देशी वाणांचे बियाणे संवर्धन आगळ्या वेगवेगळ्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. 

पाथ्रुडकर यांच्याजवळ संग्रही असलेल्या बिया 
पालेभाज्या : अंबाडी, पालक, मेथी, शेपू, चुका, चाकवत, पोकळा, लालमाठ, राजगिरा, कोबी, करडई, तांदूळसा, तांबडेपान, कोथिंबीर, कडिपत्ता, मायाळू, फुलकोबी आदी. 

फळभाज्या : मिरचीचे 4/5 प्रकार, काकडी, घोसाळी, कर्टुले, डबलबी, मुळा, गाजर, ढेमसे, पावटा, घेवडा, वाल, शेंदाड (चिबूड), खरबूज, कलिंगड, टोमॅटो, पडवळ, अबई, पठाडी, गवार, दोडका, दूधी व काशिफळ भोपळा, कोहळा, डांगर, शेवगा, हादगा, भेंडी, रानभेंडी, कारले, वाटाणा, कारळे, अळसुंदा आदी. 

कडधान्ये : चवळी, जवस, हुलगा, काळे तीळ, राजमा, मका, ज्वारी, गहू, उडीद, भगर आदी. 
वृक्ष /औषधी झाडे : सीताअशोक, अशोक, करंज, कडूनिंब, रायआवळा, आपटा, शमी, बेल, खैर कवठ, मेंदी, खजूर, बहावा, चिंच, रामफळ, सीताफळ, हनुमान फळ, सरकी, देवकापूस, शिरीष, कांचन, लाल, गुलाबी हादगा, अर्जुन, ऐन, शिवण, गुंज, रीठा, तुळशीचे विविध प्रकार, रतनगुंज, ताम्हण, बिक्‍सा, गुलमोहर, विलायती चिंच, गुळवेल, हिरडा, एरंड, चिकू, पपपई, कोकम, बोर, जांभूळ, काटेसावर, कॉफी, अपामारी, रिंगणी, टिकोमा, बीजा, रोहन, पळस, अंजीर आदी. 

फुलझाडे : कमळ, अबोली, पारिजातक, पेंटास, डेझी, लॅव्हेन्डर, आईस्क्रीम क्रीपर, सदाफुली, डेलिया, रेनलिली, मेक्‍सिकन सूर्यफूल, भेंडीगुलाब, दुपारी, वैजयंती, गणेशवेल, सुपारी, मॉर्निंग ग्लोरी, बदकवेल, गुलबक्षी, गोकर्ण, बेसिल, चिनीगुलाब, लसूणवेल, कॉसमॉस, झेंडू, झिनिया, अक्कलकारा, गलांडा, तेरडा, ऍडेनियम, लाजाळू, पॅशनफ्रूट, चांदणी वेल, कोंबडा, शंकासूर, कोरांटी, जांभळा, पिवळा धोतरा, हळदीकुंकू, सोनचाफा कर्दळ आदी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com