प्रश्‍न सोडवण्यासाठी ज्ञान वापरा - डॉ. देवानंद शिंदे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

कोल्हापूर - "अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी रोजच्या आयुष्यातील प्रश्‍न डोळसपणे समजून घेऊन त्यावर ठोस उपाय शोधण्याकरिता आपल्या अर्जित ज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागात आयोजित टेकफेस्ट 2017 प्रकल्प स्पर्धेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. 

कोल्हापूर - "अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी रोजच्या आयुष्यातील प्रश्‍न डोळसपणे समजून घेऊन त्यावर ठोस उपाय शोधण्याकरिता आपल्या अर्जित ज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागात आयोजित टेकफेस्ट 2017 प्रकल्प स्पर्धेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. 

डॉ. म्हणाले, ""विद्यार्थ्यांनी आपल्या सभोवताली असणाऱ्या अनेक लहान समस्यांकडेही संशोधनात्मक नजरेने पाहावे. आपण मिळवलेल्या ज्ञानाचा या समस्यांवर उपाययोजना शोधण्याकरिता अधिक कल्पकतेने वापर करावा; मात्र प्रकल्पांच्या माध्यमातून केलेले हे उपयोजन लादलेले नसून स्वयंप्रेरित असले पाहिजे. अशा स्वयंप्रेरित संशोधनाला चालना देण्याकरीता विद्यार्थ्यांनी रिसर्च ग्रुप्सची स्थापना करून विविध कल्पनांना मूर्त स्वरूप द्यावे, त्याचे डॉक्‍युमेंटेशन करावे तसेच या नूतन संशोधनाचे पेटंट घ्यावे.'' 

एक विद्यार्थी - एक नवकल्पना या सूत्राप्रमाणे केल्यास अधिविभागाचे एक स्वतंत्र संशोधन भांडार लवकरच उभे राहील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. 

तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक प्रा.डॉ. जयदीप बागी यांनी स्पर्धेचा हेतू विषद केला. 

विद्यार्थ्यांच्या संशोधकतेला प्रोत्साहन देण्याकरिता विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागात या टेकफेस्टचे तीन गटांत आयोजन केले होते. यामध्ये अधिविभागाच्या तृतीय वर्ष, अंतिम वर्ष बी.टेक. व एम.टेक.च्या विद्यार्थ्यांनी या वर्षी केलेल्या संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण झाले. पदव्युत्तर स्तराबरोबरच पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांनी संशोधनात रुची घेऊन आपले योगदान द्यावे, असेही ते म्हणाले. मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी, इलेट्रॉनिकस अँड कम्युनिकेशन टेक्‍नॉलॉजी, केमिकल, फूड टेक्‍नॉलॉजी व एनर्जी टेक्‍नॉलॉजी या शाखांमधील प्रकल्पांचे सादरीकरण झाले. वर्किंग मॉडेल, लाइव डेमॉन्स्ट्रेशन, पोस्टरच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संशोधन प्रकल्पांचे वैज्ञानिक विचार, नवकल्पकता, संशोधन पद्धती आदी मुद्द्यांवर परीक्षकांनी मूल्यांकन केले. डॉ. पी. डी. पाटील यांनी आभार मानले. 

Web Title: Techfest 2017 Cup of closing ceremony