खंडोबाचीवाडीतील महिलेचा खून अनैतिक संबंधाच्या संशयातून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

भिलवडी - खंडोबाचीवाडी (ता. पलूस) येथे शनिवारी सायंकाळी झालेला महिलेचा खून चारित्र्याच्या संशयातून तिच्या पतीने केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. संशयित पती विश्वास आण्णा शिंदे (वय ५५, रा. शिंदे मळा, खत कारखान्यासमोर) याने आज खुनाची कबुली दिली. त्याला अटक करण्यात आली.

भिलवडी - खंडोबाचीवाडी (ता. पलूस) येथे शनिवारी सायंकाळी झालेला महिलेचा खून चारित्र्याच्या संशयातून तिच्या पतीने केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. संशयित पती विश्वास आण्णा शिंदे (वय ५५, रा. शिंदे मळा, खत कारखान्यासमोर) याने आज खुनाची कबुली दिली. त्याला अटक करण्यात आली.

अधिक माहिती अशी, विश्वास हा पत्नी वर्षा (वय ४२) सह शिंदे मळ्यातील घरात राहत होता. त्यांना एक मुलगी असून तिचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले आहे. वर्षा शेतीतील कामाबरोबर शिलाईकाम व भाजी विक्री करीत होत्या. शनिवारी (ता. ३) सायंकाळी त्या जाऊबरोबर शेतात भुईमूग शेंगा तोडण्यासाठी गेल्या होत्या. जाऊ घरी गेल्यानंतर त्या वैरण काढण्यासाठी मागे थांबली. त्यांच्या जाऊने वर्षा शेतात वैरणीसाठी थांबल्याचे विश्वासला सांगितले. त्याला दारूचे व्यसन होते. पत्नीच्या चारित्र्यावर त्याचा संशय होता. वर्षा शेतात गेल्यापासून तो पाळत ठेवून होता. जाऊ घरात गेल्याचे पाहून धारदार विळा घेऊन तो शेतात गेला. तिला ‘उसात आणखी वैरण काढू’ म्हणून नेले. काही समजायच्या आत विळा घेऊन वर्षाच्या उजव्या मानेवर दोन - तीन जबरी वार केले. घाव वर्मी बसल्याने ती जागीच ठार झाली. त्यानंतर तिच्या गळ्यातील मंगळसूत्र व मोबाईल तोडून उसात टाकले. विळा जवळच्या पांडुरंग चेंडगे यांच्या विहिरीत फेकून दिला. रक्त लागलेले कपडे कॅनालमध्ये टाकले. घरी येऊन आंघोळ केली. पुन्हा  भावकीतील लोकांना घेऊन वर्षाचा शोध सुरू केला. रात्री पोलिसांनी श्वानपथक मागविले. श्वानास वस्तुंचा वास दिल्यानंतर ते विहिरीपर्यंत गेले व पुन्हा त्याने विश्वासच्या घरापर्यंत माग काढला. उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे, एलसीबीचे निरीक्षक बाजीराव पाटील, भिलवडी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुनील हारुगडे आणि पथकाने तातडीने कसून तपास करीत बारा तासात गुन्हा उघडकीस आणला. गुन्ह्यातील सर्व वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

Web Title: Temple wadi woman suspected of the murder of illicit relations