Tempo accident at shrigonda seven people injured
Tempo accident at shrigonda seven people injured

वऱ्हाडाच्या टेम्पोला अपघात; सात जण गंभीर जखमी

श्रीगोंदे : जेजुरी येथून विवाह उरकून परतणाऱ्या वऱ्हाडाचा टेम्पो आज रात्री 8:30 वाजता निमगावखलु ता. श्रीगोंदे येथे पलटी झाला. त्यात सात जण जखमी झाल्याची माहिती आहे. 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील अजनुज येथील हे वऱ्हाड होते. नगर दौड रस्त्याचे काम ज्या ठिकाणी अर्धवट आहे, तेथे हा अपघात झाला. जेजुरीवरून विवाह उरकून टेम्पो येत असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने पलटी झाला. त्यातील सात जण जखमी झाले असून एका जखमीला दौडला तर इतरांना काष्टी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com