तात्पुरत्या सत्तेसाठी राष्ट्र अन्‌ समाज उद्‌ध्वस्त होऊ नये 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

सोलापूर : मतांचे धुव्रीकरण करून सत्ता मिळविता येते. मिळालेली सत्ता जाते. राष्ट्र आणि समाज मात्र कायमस्वरूपी रहातो. मतांच्या ध्रुवीकरणातून तात्पुरता सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्र व समाज उद्‌ध्वस्त होऊ नये याची काळजी पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी अशी अपेक्षा ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केली. 

डॉ. साळुंखे अमृतमहोत्सवी गौरव समितीच्यावतीने आज डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात डॉ. साळुंखे यांचा सत्कार झाला. त्यावेळी बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडवारवादी विचारवंत ज. वि. पवार होते. यावेळी ज्येष्ठ समीक्षक गो. मा. पवार, डॉ. अजीज नदाफ आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: The temporal power should not destroy the nation and society