कोरेगावात दहा उमेदवार कोट्यधीश 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

कोरेगाव - कोरेगाव तालुक्‍यातून जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांपैकी विविध राजकीय पक्षांचे दहा अधिकृत उमेदवार कोट्यधीश आहेत. राजकीय आरोप-प्रत्यारोपांबरोबरच कोट्यधीश उमेदवारांच्या संपत्तीबाबत तालुक्‍यात जोरदार चर्चा सुरू आहे. 

कोरेगाव - कोरेगाव तालुक्‍यातून जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांपैकी विविध राजकीय पक्षांचे दहा अधिकृत उमेदवार कोट्यधीश आहेत. राजकीय आरोप-प्रत्यारोपांबरोबरच कोट्यधीश उमेदवारांच्या संपत्तीबाबत तालुक्‍यात जोरदार चर्चा सुरू आहे. 

उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या विवरणपत्राच्या माध्यमातून संबंधित उमेदवारांच्या स्थावर, जंगम मालमत्तेच्या तपशिलाबाबतची माहिती पुढे आली आहे. त्यानुसार पिंपोडे बुद्रुक गटातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मनोज अनपट यांच्याकडे एक कोटी 26 लाख 88 हजार 360 रुपये मालमत्ता आहे. ल्हासुर्णे गटातील कॉंग्रेसचे उमेदवार किरण बर्गे यांच्याकडे दोन कोटी 15 लाख एक हजार 351 एवढी मालमत्ता आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार जयवंत भोसले यांच्याकडे एक कोटी 56 लाख 93 हजार 127 एवढी मालमत्ता आहे. वाठार किरोली गटातील कॉंग्रेसचे उमेदवार भीमराव पाटील यांच्याकडे दोन कोटी 78 लाख 55 हजार 721 रुपयांची मालमत्ता आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार संभाजीराव गायकवाड यांच्याकडे एक कोटी 54 लाख आठ हजार 200 एवढी मालमत्ता आहे. 

पंचायत समितीची निवडणूक लढवणाऱ्यांमध्ये किन्हई गणातील राष्ट्रवादीचे उमेदवार निवृत्ती होळ यांच्याकडे एक कोटी 56 लाख 30 हजार एवढी मालमत्ता आहे. याच पक्षाच्या सातारारोड गणातील उमेदवार शीला झांजुर्णे यांच्याकडे एक कोटी 67 लाख 11 हजार एवढी मालमत्ता आहे. एकंबे गणातील कॉंग्रेसचे उमेदवार दुष्यंत शिंदे यांच्याकडे एक कोटी सहा लाख 70 हजार 42 रुपये एवढी मालमत्ता आहे. वाठार किरोली गणातील कॉंग्रेसचे उमेदवार अण्णासाहेब निकम यांच्याकडे एक कोटी 14 लाख 30 हजार 944 एवढी मालमत्ता आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश उबाळे यांच्याकडे एक कोटी सात लाख 26 हजार 949 एवढी मालमत्ता आहे. त्याशिवाय अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या व आज अर्ज मागे घेतलेल्या काही उमेदवारांची संपत्तीही कोट्यवधीत आहे.

पाचवी ते पदव्युत्तर शिकलेले उमेदवार 
कोरेगाव तालुक्‍यातून विविध पक्षांतून निवडणूक लढवणाऱ्यांपैकी काही उमेदवारांचे शिक्षण जेमतेम पाचवी, नववी, दहावी, बारावीपर्यंत झाले असून, बरेच उमेदवार पदवीधर व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेले आहेत.

Web Title: Ten candidates millionaire in koregaon