सुशोभीकरणातून स्वच्छता होणार लोकाभिमुख! 

सुशोभीकरणातून स्वच्छता होणार लोकाभिमुख! 

कऱ्हाड - स्वच्छ कऱ्हाड, सुंदर कऱ्हाडची हाक देत पालिकेने शहरातील स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी कल्पकता लढविली आहे. त्यासाठी शहरातील दहापेक्षाही जास्त ठिकाणांसह वेगवेगळ्या वास्तूही सुशोभीत करण्यात येणार आहेत. त्यात नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी दोन "सेल्फी पॉइंट' ठेवले आहेत. तेथे "आय लव्ह कऱ्हाड' अशी थिम राबविली आहे. 

स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत पालिकेने स्वच्छतेला प्राधान्य देताना शहरातील वास्तूही सुशोभीत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यात शहरातील मुख्य चौकांसह वेगवेगळ्या प्रवेशद्वारांत सुशोभीकरणाचा आराखडा पालिकेने आखला आहे. त्यात पालिकेच्या इमारतीत दोन प्रकल्प उभे होणार आहेत. त्यातील पार्किंगच्या जागेत मोकळ्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांद्वारे दोन राजहंस उभारण्यात आले आहेत. त्यावर विजेचे बल्ब सोडण्यात आले आहेत. त्यामुळे दिवसासह रात्रीही त्याची सुंदरता दिसून येते. 

प्रीतिसंगम बागेत भुईकोट किल्ल्यातून पाण दरवाजा येतो. त्याच्या पायऱ्याही रंगविण्यात येणार आहेत. त्यावर वाघाचे किंवा अन्य चित्र रेखाटून ते अधिक आकर्षित केले जाणार आहे. दत्त चौक ते कृष्णा नाका येथील गतिरोधकांना कंपोझिट डिझाईनव्दारे सुशोभीत करणार आहे. सोमवार पेठेतील गणपती मंदिराचा पार सुभोभीत करून रंगविला जाणार आहे. कोयनेश्वर व कमळेश्वर मंदिराचा परिसर सुशोभीत करण्यात येणार आहे. प्रीतिसंगम बागेतही काही प्रतिकृती बसविण्याचा विचार पालिका करत आहे. चावडी चौकातील महत्त्वाच्या इमारतींना कल्पकतेने रंगवून त्यांचे सुशोभीकरण वाढविण्यात येणार आहे. कोल्हापूर नाका ते भेदा चौक आणि दत्त चौक ते कृष्णा नाका 

स्ट्रीटलाइटचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. प्लॅस्टिकच्या कपांचा वापर करून पालिका प्रवेशव्दारात महात्मा गांधी यांचा पुतळा उभा करण्यात येणार आहे. कोल्हापूर नाक्‍यावरील प्रवेशव्दारात "आय लव्ह कऱ्हाड'अशी प्रतिकृती उभी करून तो सेल्फी पॉइंट करण्यात येणार आहे. कृष्णा नाक्‍यावर मोकळ्या सर्कलमध्ये विमान उडविणाऱ्या मुलांचे शिल्प बसवले जाणार आहे. 

""शहराच्या सुशोभीकरणासाठी पालिकेने काही ठिकाणांसह वास्तू सुशोभीकरणाचे महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात निश्‍चित वाढ होणार आहे. नागरिकांनीही यात सहभागी होऊन वेगवेगळ्या संकल्पना सुचवाव्यात. योग्य असणाऱ्या संकल्पना शहरात निश्‍चित राबवल्या जातील.'' 

-विजय वाटेगावकर,  सभापती,  नियोजन समिती, कऱ्हाड पालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com