आमदार बाबाजानी दुर्राणी यांना धक्काबुक्की पाथरीत तणाव ; बाजारपेठ बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pathari

आमदार बाबाजानी दुर्राणी यांना धक्काबुक्की पाथरीत तणाव ; बाजारपेठ बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाथरी : अत्यंविधीसाठी पाथरी शहरातील मुस्लिम स्मशानभूमीत आलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांना एका इसमाने धक्काबुक्की केल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संपूर्ण पाथरी शहरात तणावाचे वातावरण पसरून बाजारपेठ बंद कऱण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी मोहमंद चाऊस या व्यक्तीविरुध्द पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंद झाला आहे.

पाथरी शहरातील नागरीक लालू कुरेशी यांच्या अंत्यसंस्कारासाठी आमदार बाबाजानी दुर्राणी हे गुरुवारी (ता.18) दुपारी माळीवाडा परिसरातील जुम्मा मशीद कब्रस्थान येथे आले होते. त्या ठिकाणी जिल्हा बँकेचे संचालक दत्तराव मायंदळे, बखतीयार खान व जुबेर बीन हावेल यांच्याशी आमदार श्री.दुर्राणी चर्चा करत असतांना अचानक तेथे आलेल्या मोहम्मद बीन सईद बीन किलेब चाऊस याने त्यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला चढवला. आमदार दुर्राणी यांना धक्का बुक्की करन जीवे मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा: औरंगाबाद : जीवे मारण्याचा धाक दाखवून लुटले

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थितीतामध्ये एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती पाथरी शहरात वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे शहरात तणावपूर्ण शांतता पसरली. व्यापाऱ्यांनी त्यांची दुकाने बंद करून घेतली. दरम्यान, आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी या प्रकारानंतर पाथरी पोलिस ठाण्यात मोहंमद चाऊस यांचे विरोधात तक्रार दिली आहे. त्यावरून गुन्हा नोंद झाला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गायकवाड हे करीत आहेत.

हेही वाचा: इचलकरंजी हादरली : तलवारीने सपासप वार करीत तरुणाचा निर्घृण खून

हद्दपार करा व्यापाऱ्यांकडून निवेदन

आमदार बाबाजानी दुराणी यांच्यावर हल्ला करणारे मोहंमद चाऊस हे शहरातील शांतता भंग करत आहेत. त्यांचे वर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे मोहम्मद चाऊस यांना हद्दपार करावे अन्य़था सोमवार, ता. २२ नोव्हेंबर पासून शहरातील सर्व व्यापारी आपली दुकाने बेमुदत बंद ठेवतील अश्या आशयाचे निवेदन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आरिफ खान यांनी तहसीलदार, पाथरी यांना दिले आहे. निवेदनावर पप्पूसेठ लाहोटी, बालकिशन राठी, शिवाजी चिंचाने, राजेश परतानी,

- गजू उंबरकर, जगदीश राठी यांच्या स्वाक्षरी आहेत.

loading image
go to top