

BJP workers protest on the highway after MLA Gopichand Padalkar’s development banner was torn in Sangli.
Sakal
जत : आमदार गोपीचंद पडळकर यांचे विकास कामासंदर्भात जत शहरात ठिकठिकाणी लावलेले पोस्टर्स शनिवारी (ता. १) रात्री अनोळखीने फाडल्याने शहरात एकच खळबळ उडाली. आज सकाळी ही घटना उघडकीस येताच पडळकर समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळी शिवाजी पेठेत निषेध नोंदवून थेट महाराणा प्रताप चौक येथे एकत्रित येत विजापूर-गुहागर महामार्ग अर्धा तास रोखून धरला. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.